Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 12:36 PM2019-02-01T12:36:59+5:302019-02-01T13:00:56+5:30

Budget 2019: करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Budget 2019 : Individual taxpayers having annual income upto 5 lakhs will get full tax rebate | Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची मोठी घोषणा6.50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्तमध्यमवर्गीयांना मोठा दिलासा,कर मर्यादा आता 2.50 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांवर

नवी दिल्ली -पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये बसलेला फटका, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी-नोकरदार वर्गात असलेली नाराजी आणि तोंडावर आलेला लोकसभेचा महासंग्राम लक्षात घेऊन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. हे अंतरिम बजेट असलं तरी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसारच, करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशभरातील ३ कोटी करदात्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. ८० सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५ लाख रुपयेच कायम ठेवण्यात आली आहे.

Budget 2019 Latest News & Live Updates
 


 




Web Title: Budget 2019 : Individual taxpayers having annual income upto 5 lakhs will get full tax rebate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.