Budget 2019: 5,5,5 अर्थमंत्री गोयल 'असा' खेळून गेले जॅकपॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:43 AM2019-02-02T05:43:47+5:302019-02-02T05:44:43+5:30

अर्थमंत्री सीए पीयूष गोयल यांनी या वेळेस समतोल साधण्याचा प्रयत्न करीत ५ या संख्येमध्ये खेळ केला आहे.

Budget 2019 5,5,5 Finance Minister Goyal went on playing 'Aa' Jackpot | Budget 2019: 5,5,5 अर्थमंत्री गोयल 'असा' खेळून गेले जॅकपॉट

Budget 2019: 5,5,5 अर्थमंत्री गोयल 'असा' खेळून गेले जॅकपॉट

Next

- उमेश शर्मा (सीए)

अर्थमंत्री सीए पीयूष गोयल यांनी या वेळेस समतोल साधण्याचा प्रयत्न करीत ५ या संख्येमध्ये खेळ केला आहे. ५ एकरला ६,००० रुपयांची पेन्शन, ५ लाख रुपयांना कर सवलत आणि पुढील ५ वर्षांची सत्ता असा ५,५,५ चा जॅकपॉट जुगारासारखा खेळला आहे.

या अर्थसंकल्पीय खेळाची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या- 
रु. ५ लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर लागणार नाही. सरकारला अजून ५ वर्षे मिळावी, म्हणून मर्यादा ५ लाखांपर्यंत केली असे वाटते.
पगारदार व्यक्तींना पगाराच्या उत्पन्नातून रु. ५०,००० ची वजावट मिळणार आहे. अगोदर ही मर्यादा रु.४०,००० होती.
या आधी घराच्या उत्पन्नावर काल्पनिक भाडे (नोशनल रेंट) एकच घराचे करमुक्त होते, आता ते दोन घरांसाठी करमुक्त केले.
भांडवली उत्पन्नातून वजावटीसाठी या आधी एका घरातच गुंतवणूक केली, तर वजावट मिळत होती, परंतु आता दुसºया घरात गुंतवणूक केली, तरीही वजावट मिळेल. भांडवली उत्पन रु.२ कोटींपेक्षा कमी असेल, तरच या योजनेचा फायदा घेता येईल. ही संधी फक्त एकदाच उपलब्ध असेल.
बांधकाम क्षेत्रातील कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तयार स्टॉक विकला नसेल, तर एका वर्षानंतर त्यावर काल्पनिक उत्पन्न (नोशनल इन्कम) धरून कर भरावा लागत होता, परंतु आता ही मर्यादा दोन वर्षांपर्यंत केली आहे. यामुळे बिल्डर्स लोकांना फायदा होणार आहे.
कलम ८० आयबीए अंतर्गत हाउसिंग प्रोजेक्ट वर्ष २०२० पर्यंत घेतले, तरी वजावट मिळेल. बांधकाम क्षेत्राला याचाही फायदा मिळेल.
अचल संपत्तीचा भाड्यावर उद्गमी करकपात (टीडीएस) करण्याची मर्यादा रु. १,८०,००० वरून २,४०,००० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बँक व पोस्ट आॅफिसमधील ठेवींच्या व्याजावरत टीडीएस कपात करण्याची मर्यादा रु. १०,००० वरून रु. ४०,००० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आयकराचे रिटर्न्स लवकर प्रोसेस होतील, तसेच रिफंड २४ तासांच्या आत देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Web Title: Budget 2019 5,5,5 Finance Minister Goyal went on playing 'Aa' Jackpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.