पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा BSFचा जवान अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 01:46 PM2018-11-04T13:46:59+5:302018-11-04T14:01:19+5:30

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाला अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

bsf jawan arrested for spying for pakistan intelligence agency in punjab | पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा BSFचा जवान अटकेत

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा BSFचा जवान अटकेत

Next

नवी दिल्ली - पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाला अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधील ममदोट पोलीस स्टेशनमध्ये बीएसएफच्या 29व्या बटालियनमध्ये ऑपरेटरचे काम करणारा जवान शेख रियाजउद्दीनविरोधात हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाजुद्दीन हा महाराष्ट्रातील मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. 

लिखित स्वरुपात तक्रार मिळाल्यानंतर शेख रियाजुद्दीनला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी त्याच्याकडील दोन मोबाइल फोन आणि तब्बल सात सिमकार्ड्सही जप्त केले आहेत. बीएसएफ डेप्युटी कमांडंटनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेख रियाजुद्दीननं सीमारेषेजवळील रस्त्यांचे व्हिडीओ आणि बीएसएफ युनिटमधील अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक पाकिस्तानातील हस्तकांसहीत शेअर केले. फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि मोबाइलच्या माध्यमातून सूचना ISIचा एक ऑपरेटर मिर्झा फैसलसहीत शेअर करत होता. 

कोर्टासमोर करणार सादर

अटक करण्यात आलेल्या बीएसएफ जवानाला रविवारी (4 नोव्हेंबर) कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात येईल. 

(ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण; सेजल आणि नेहाने केला निशांतचा गेम)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  डीआरडीओमध्ये कनिष्ठ अभियंता असलेल्या निशांत अग्रवालला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. निशांतला पाकिस्तानी हस्तकाकडून 30 हजार अमेरिकन डॉलर महिना पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. कॅनडात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, असं प्रलोभन निशांतला दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्यानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. 

Web Title: bsf jawan arrested for spying for pakistan intelligence agency in punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.