BrahMos Missile : निशांत अग्रवाल असा अडकला पाकिस्तानच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:22 AM2018-10-10T09:22:04+5:302018-10-10T09:23:25+5:30

ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्राची अत्यंत गोपनीय माहिती निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाला पुरवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून भारतीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

BrahMos Missile Engineer Nishant Agrawal Catch in Pakistan's honey trap | BrahMos Missile : निशांत अग्रवाल असा अडकला पाकिस्तानच्या जाळ्यात

BrahMos Missile : निशांत अग्रवाल असा अडकला पाकिस्तानच्या जाळ्यात

Next

लखनौ -  भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेल्या ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्राची अत्यंत गोपनीय माहिती निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाला पुरवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून भारतीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने सोशल मीडियाच्या माध्यमातून हनिट्रॅपमध्ये ओढून निशांतकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळवल्याचे समोर आले आहे. 

 नेहा शर्मा आणि पूजा रंजन या नावांनी सोशल मीडियावर असलेल्या अकाऊंटशी निशांत हा चॅटिंग करत असे. तसेच अत्यंत संवेदनशील काम करत असतानाही गोपीन माहितीबाबत निशांत बेफिकीर होता. त्यामुळेच तो सहजपणे पाकिस्तानच्या जाळ्यात ओढला गेला, असे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तो सोशल मीडियावरील साइल लिंक्डइनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे निशांतचे वडील प्रदीप अग्रवाल यांना धक्का बसला असून, आपल्या मुलाने असे काही केले असेल यावर विश्वास बसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

सध्या एटीएस अधिकारी निशांतच्या घर आणि ऑफिसमधून मिळालेल्या डिजिटल माहितीचा तपास करत आहेत. त्याच्या खासगी लॅपटॉपमध्ये काही गोपनीय पीडीएफ फाइल मिळाल्या आहेत. यामध्ये अत्यंत गोपनीय माहिती आहे. ही माहिती जर शत्रूराष्ट्राला मिळाली तर देशासाठी ही बाब अत्यंत धोकादायक असेल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.  

दरम्यान,  पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेर असलेल्या कानपूर (उत्तर प्रदेश) मधील एका महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणारा निशांत अग्रवाल या हेराला एटीएसच्या पथकाने मंगळवारी न्यायालयात हजर केले. थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने अग्रवालला तीन दिवसांचा ट्रांझिट रिमांड मंजूर केला. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवत असल्याच्या संशयावरून निशांत अगरवालला  नागपूरच्या एअरोस्पेस सेंटरमधून एटीएसनं सोमवारी अटक केली होती.   

...म्हणून 'ब्राह्मोस'ची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा
 ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.  
ब्राह्मोस लाँच झालं तेव्हा या क्षेपणास्त्राइतकं सक्षम अँटी शिप क्रूझ मिसाईल अमेरिकेकडेही नव्हतं. हिंदी महासागरात शत्रूच्या जहाजांपासून संरक्षणात ब्राह्मोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतंय. नेमकी हीच ताकद पाकिस्तान आणि चीनला खुपतेय. हिंदी महासागरात घुसखोरीचे प्रयत्न भारताचे हे दोन शेजारी करताहेत. परंतु, ब्राह्मोसमुळे त्यांचे मनसुबे उधळले जाताहेत. अण्वस्त्रसज्ज बंकर, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावर उडणारी विमानं यांना ब्राह्मोस दुरूनच लक्ष्य करतं.   

Web Title: BrahMos Missile Engineer Nishant Agrawal Catch in Pakistan's honey trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.