विटंबना झालेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे योगी सरकारकडून 'भगवीकरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 08:54 AM2018-04-10T08:54:18+5:302018-04-10T08:54:18+5:30

आतापर्यंत आपण नेहमीच गडद रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझर अशा विदेशी पेहरावातील बाबासाहेबांचे पुतळे किंवा फोटो पाहिले आहेत.

BR Ambedkar statue which was vandalized recently has been rebuilt and painted saffron in colour | विटंबना झालेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे योगी सरकारकडून 'भगवीकरण'

विटंबना झालेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे योगी सरकारकडून 'भगवीकरण'

googlenewsNext

बदाऊन: उत्तर प्रदेशच्या दुगरय्या येथे विटंबना करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर याठिकाणी लगेचच नवा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता या पुतळ्याच्या रंगावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा भगव्या रंगाच्या शेरवानीत आहे. योगी सरकारच्या या 'भगवीकरणा'वर स्थानिकांकडून टीका केली जात आहे. 

बाबासाहेबांच्या पुतळ्याचा रंग पाहून लोक संतप्त झाले आहेत. आतापर्यंत आपण नेहमीच गडद रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझर अशा विदेशी पेहरावातील बाबासाहेबांचे पुतळे किंवा फोटो पाहिले आहेत. त्यामुळे या पुतळ्याच्या शेरवानीचा भगवा रंग अनेकांना खटकत आहे. त्यामुळे हा पुतळा पुन्हा रंगवण्यात यावा, अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी भारत सिंग जाटव यांनी केली. 
गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचारविरोधी (अॅट्रॉसिटी) कायद्यात झालेल्या बदलांमुळे दलित समाजात संतप्त वातावरण आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात योगी सरकारने डॉ. भीमराव आंबेडकर ही नाव लिहण्याची प्रचलित पद्धत बदलून त्यामध्ये 'रामजी' (डॉ. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव) शब्द लिहण्याची अधिकृत सक्ती केली होती. या सगळ्यामुळे सध्या दलित समाजात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. 


Web Title: BR Ambedkar statue which was vandalized recently has been rebuilt and painted saffron in colour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.