नेहरूंच्या जयंतीला मागवली दीनदयाळ यांची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:17 AM2017-11-25T04:17:40+5:302017-11-25T04:19:36+5:30

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित साहित्य सादर करा, असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने केल्यामुळे सारेच जण चक्रावून गेले.

Books of Deen Dayal invited for Nehru's birth anniversary | नेहरूंच्या जयंतीला मागवली दीनदयाळ यांची पुस्तके

नेहरूंच्या जयंतीला मागवली दीनदयाळ यांची पुस्तके

Next

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित साहित्य सादर करा, असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने केल्यामुळे सारेच जण चक्रावून गेले. मुख्य म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित पुस्तके पाठवण्याचे आवाहन मात्र केले गेले नाही.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या डॉ. बी. आर. आंबेडकर सेंट्रल लायब्ररीने सहभागी प्रकाशकांना १० नोव्हेंबर रोजी एक मेल पाठविला आहे. त्यात पं. दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कधीही प्रकाशित झालेली आणि २०१६-१७मध्ये प्रकाशित झालेली अन्य पुस्तके सादर करण्यात यावीत, असे कळविण्यात आले.
जेएनयूने १४ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. मात्र प्रकाशकांना याबाबत काही निर्देश दिल्याचे वृत्त ग्रंथपाल रमेश सी. गौर यांनी फेटाळले. ग्रंथालयाचे सहायक ऋषभ जैन यांनी जारी केलेल्या पत्रात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीनदयाल उपाध्याय यांच्याशी संबंधित कधीही प्रकाशित झालेली पुस्तके सादर करण्यात यावीत, असा उल्लेख होता.
>हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्यांची पुस्तके
गौर यांनी सांगितले की, एवढे मोठे ग्रंथ प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले होते. यात ६० विक्रेते आणि प्रकाशक यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या एका प्रकाशकाने सांगितले की, जेएनयूकडून अधिकृत मेल मला मिळाला. त्यात हिंदुत्वाची प्रतिमा असलेले नेते व दलित समाजसुधारकांशी संबंधित पुस्तके सादर करावीत, असे नमूद केले होते. अन्य एका अधिकाºयाने सांगितले की,
डॉ. आंबेडकर आणि उपाध्याय यांच्याशी संबंधित ५०० पुस्तके खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीनदयाळ उपाध्याय यांची विचारसरणी ही नेहरूंच्या विचारांच्या विरुद्ध आहे.

Web Title: Books of Deen Dayal invited for Nehru's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.