ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या, दूरदर्शनवरुन जनजागृती करा - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 02:16 PM2017-10-27T14:16:07+5:302017-10-27T14:18:26+5:30

आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. चेन्नईच्या एका वकिलाने ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

Blue Whale Game is a National Problem says Supreme Court | ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या, दूरदर्शनवरुन जनजागृती करा - सर्वोच्च न्यायालय

ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या, दूरदर्शनवरुन जनजागृती करा - सर्वोच्च न्यायालय

Next

नवी दिल्ली - आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. चेन्नईच्या एका वकिलाने ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ब्लू व्हेल गेममुळे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात जवळपास 100 आत्महत्या झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण नोंदवलं. 

यासोबतच ब्लू व्हेल गेमचे धोके लक्षात यावेत यासाठी दूरदर्शन आणि खासगी चॅनेल्सवर जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिला आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना सांगितलं आहे की, तज्ञांची समिती गठीत केली असून, पुढील तीन आठवड्यात रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

खरंतर ब्लू व्हेल चॅलेंज ही एक अनेक टास्क्सची मालिका आहे. ज्यामधील अधिकाधिक टास्क्स् हे हिंसक असतात. या गेममध्ये सहभागी होणाऱ्याला 50 दिवसांपर्यंत अॅडमिनिस्ट्रेटरकडून विविध टास्क्स दिले जातात. बऱ्याच्या पौगंडावस्थेतील मुले या गेमला बळी पडतात. सहजपणे जाळ्यात ओढता येतील अशा मुलांना ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या अॅडमिनिस्ट्रेटरकडून हेरले जाते. चाइल्ड पोर्नोग्राफीप्रमाणेच दुसऱ्या दिशेला बसलेल्या व्यक्ती व्हर्च्युअल गप्पांमधून मुलांच्या कमकुवतपणाचा फायदा उठवतात. या चॅलेंज गेमसाठी कुणी मास्टरमाइंड किंवा कुठल्या माध्यमाची गरज नाही. ही एक प्रवृत्ती आहे जी सातत्याने फैलावत आहे.  असा हा मुलांच्या जीवावर बेतत असलेला गेम कुठल्याही वेबसाइट किंवा अॅपवर नसल्याने त्याला पायबंद घालणे आव्हानात्मक ठरणार आहे. 

ब्ल्यू व्हेल गेमचे पहिले प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. तेव्हा सुसाइड ग्रुप किंवा डेथ ग्रुप्स या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या ग्रुप्सनी रशियातील सोशल नेटवर्किंग Vkontakte वर मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते.  2015 ते 2016 दरम्यान रशियामध्ये सुमारे 130 मुलांनी या चॅलेंजपायी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने फिलिप बुदेकिन याला अटक केली होती.  ब्लू व्हेलमुळे जगभरात आतापर्यंत 250 जणांनी आत्महत्या केली आहे. 

काय असते ब्लू व्हेल चॅलेंज?
ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणा-याला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.
 

Web Title: Blue Whale Game is a National Problem says Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.