भाजपाची अटकळ : कुमारस्वामी सरकार लवकरच कोसळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:51 AM2018-05-21T00:51:59+5:302018-05-21T00:51:59+5:30

येडियुरप्पा, श्रीरामुलू राज्यातच राहणार

BJP's speculation: Kumaraswamy government will soon fall | भाजपाची अटकळ : कुमारस्वामी सरकार लवकरच कोसळेल

भाजपाची अटकळ : कुमारस्वामी सरकार लवकरच कोसळेल

Next

हरिश गुप्ता।

नवी दिल्ली : आमदार होताच बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह बी. श्रीरामुलू यांनी लगेचच खासदारकीचे राजीनामे दिले. त्यांना राज्यातच ठेवून कुमारस्वामी यांचे सरकार पडण्याची वा प्रसंगी पाडण्याची भाजपा वाट पाहत आहे. तेथील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी या नेत्यांनी कर्नाटकातच असावे या हेतूनचे भाजपच्या श्रेष्ठींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कर्नाटकात भाजपा आमदारांची संख्या १0४ राहील आणि सरकार बनवण्याची वेळ आली तर फारशी अडचण येणार नाही, असे गणित आहे.
या दोघांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ २७२ म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यावर येऊ न ठेपले आहे. लोकसभा की विधानसभा याचा विचार करण्यासाठी येडियुरप्पा व श्रीरामुलू यांच्याकडे पुरेसा वेळ होता. पण या दोघांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला.
भाजपची कर्नाटकमधील जबाबदारी असलेल्या अमित शहा यांच्या निकटवर्तीयाने ‘लोकमत’ला सांगितले की, कुमारस्वामी सरकारआघाडी फार काळ टिकणार नाही. शपथविधीनंतर दोन पक्षांतील अंतर्गत मतभेद उफाळून येतील व हे सरकार कोसळेल. त्यामुळे तिथे आमचे पुरेसे आमदार असणे गरजेचे आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लगेचच बहुमत सिद्ध करायला सांगितल्यो भाजपचे सारे मनोरथ कोसळले. हे आव्हान पेलता
येणे शक्य नाही हे लक्षात
आल्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
आता काँग्रेसने जनता दलाला मुख्यमंत्रीपद दिले असले तरी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी काँग्रेस कुमारस्वामींवर दबाव आणेल. त्यामुळे तीन महिन्यांतच सरकार कुचकामी असल्याचे सिद्ध होईल असे भाजपला वाटते. बिहारमध्ये लालूप्रसाद व नितीशकुमार यांची युती जशी टिकू शकली नाही, तसाच प्रकार कर्नाटकात होईल, त्यामुळे येडियुरप्पा व श्रीरामुलू तिथेच असावेत, असे भाजपाचे म्हणणे आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
एच. डी. देवेगौडा यांना सरकार बनविण्यासाठी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि १0 महिन्यांत हात वर केले. इंदरकुमार गुजराल यांना काँग्रेसने फक्त २० महिनेच पाठिंबा दिला होता. त्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. याच इतिहासाची पुनरावृत्ती कर्नाटकात होईल, असा विश्वास भाजपला आहे. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसने कुमारस्वामींचा पाठिंबा काढून घेतल्यास विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील, असाही भाजपाचा होरा आहे.

Web Title: BJP's speculation: Kumaraswamy government will soon fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.