गुजरातमध्ये भाजपाचा नैतिक पराभवच - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 08:10 PM2017-12-18T20:10:09+5:302017-12-18T22:27:52+5:30

गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाना साधला. 

BJP's moral defeat in Gujarat - Mamata Banerjee | गुजरातमध्ये भाजपाचा नैतिक पराभवच - ममता बॅनर्जी

गुजरातमध्ये भाजपाचा नैतिक पराभवच - ममता बॅनर्जी

Next
ठळक मुद्देसहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिलाभाजपाचा नैतिक पराभवच आहे

कोलकाता : गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाना साधला. 
ट्विटरवर ममता बॅनर्जी म्हणाल्या,  गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! हा विजय तात्पुरता आणि कसाबसा मिळविलेला असून हा भाजपाचा नैतिक पराभवच आहे. गुजरातच्या जनतेने दडपशाही, अस्थिरता आणि सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मतदान केले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली. याचबरोबर, गुजरातच्या मतदारांनी 2019 च्या निवडणुकीसाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 



 
दरम्यान, गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. मात्र, गुजरातच्या जनतेने भाजपाच्याच हातात सलग सहाव्यांदा सत्ता दिली. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. जाहीर निकालांमध्ये भाजपाने  एकूण 99 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने 80 जागा जिंकल्या. इतर उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले. तर, दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा भाजपाने कॉंग्रेसची सत्ता मोडीत काढत कमळ फुलविले आहे . हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने 44 आणि काँग्रेस 21 जागा मिळविल्या आहेत. तर इतर पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत.  

Web Title: BJP's moral defeat in Gujarat - Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.