प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:32 PM2019-01-31T15:32:47+5:302019-01-31T16:03:51+5:30

सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे.

BJP's Krishan Lal Middha wins Jind By Poll | प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ

प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ

Next
ठळक मुद्देप्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाजिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कृष्णलाल मिश्रा यांनी 12 हजार 935 मतांनी विजयीकाँग्रेसचे रणदीप सुरजेवाला 22 हजार 740 मतांसह तिसऱ्या स्थानावर

जिंद ( हरियाणा) - सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपानेकाँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कृष्णलाल मिश्रा यांनी 12 हजार 935 मतांनी विजय मिळवला आहे. कृष्णलाल मिढ्डा यांना 5 हजार 566 मते मिळाली.  जननायक जनता पार्टीचे दिग्विजय सिंह चौटाला 37 हजार 631 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले. तर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना 22 हजार 740 मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

जिंद विधानसभेची निवडणूक राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. भाजपाने येथून हरिचंद मिढ्ढा यांचे पुत्र कृष्णलाल मिढ्ढा यांना उमेदवारी दिल्ली होती. तर काँग्रेसने राज्यातील दिग्गज नेते रणदीप सुरजेवाला यांना मैदानात उतरवण्याची खेळी केली होती. तर नव्याने उदयास आलेल्या जननायक जनता पार्टीने दिग्विजय सिंह चौटाला उमेदवारी दिली होती. 


विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात आतापर्यंत भाजपाला विजय मिळवला आला नव्हता. अखेर आज भाजपाने या मतदारसंघात भाजपाने आपले खाते उघडले. दरम्यान, विजयानंतर कृष्णलाल मिढ्ढा म्हणाले की, '' ज्यांनी मला आणि माझ्या पक्षाला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. या निवडणुकीत मोठे नेते आमच्या विरोधात उभे होते. मात्र आम्ही त्यांनाही पराभूत केले.'' 



 

तर काँग्रेस उमेदवार रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या पराभव मान्य केला आहे. आता मनोहरलाल खट्टर आणि कृष्णलाल मिढ्ढा हे जिंद येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असे सुरजेवाला म्हणाले.



 

Web Title: BJP's Krishan Lal Middha wins Jind By Poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.