अहमदाबाद : उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने आता गुजरातमध्येही त्याची पुनरावृत्ती व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याच्या तयारीचा भाग म्हणून ‘यूपी में ३२५, गुजरात में १५0’ अशी घोषणा असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या छायाचित्रांचे होर्डिंग्ज राज्यभर ठिकठिकाणी झळकू लागले आहेत.
डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून, आताच चार राज्यांत सत्ता मिळाल्यामुळे तिथे लवकर निवडणुका व्हाव्यात, असा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा इथे सुरू आहे.