परेश रावलांनी मोदी व दीदीचं मांडलं गणित अन् केला हिसाब बराबर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 08:44 PM2019-02-06T20:44:24+5:302019-02-06T20:45:37+5:30

परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गणित मांडले आहे.

bjp mp paresh rawal tweets algebraic formula to claim modi will survive in clash with didi mamata banerji | परेश रावलांनी मोदी व दीदीचं मांडलं गणित अन् केला हिसाब बराबर!

परेश रावलांनी मोदी व दीदीचं मांडलं गणित अन् केला हिसाब बराबर!

googlenewsNext

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असा वाद चर्चेत आला आहे. या वादावरुन भाजपाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी एक टि्वट केले आहे. 

परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गणित मांडले आहे. मोदी आणि दीदी नावांचा भागाकार (मोदी/दीदी = मोदी) केला आहे. तसेच, फोटोला 'हिसाब बराबर' अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, परेश रावल यांच्या ट्विटला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 2300 लोकांनी रिट्विट केले आहे. तर 9700 लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय काही लोकांनी त्यांच्या गणित ज्ञानाविषयी आक्षेप घेतला आहे. 


दरम्यान,  गेल्या रविवारी शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. या प्रकारानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली होती. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016 पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली. 2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. शारदा चिट फंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांची नावे समोर आली. सत्ताधाऱ्यांच्या आशीवार्दामुळेच हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने अनेकदा केला. 
 

Web Title: bjp mp paresh rawal tweets algebraic formula to claim modi will survive in clash with didi mamata banerji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.