चपलेनं मारलं; 'शिस्तप्रिय' भाजपाच्या खासदार - आमदारामध्ये 'राडा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 07:43 PM2019-03-06T19:43:20+5:302019-03-06T19:54:51+5:30

सपा आणि बसपामध्ये झालेल्या आघाडीने उत्तर प्रदेशात भाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येत आहे.

BJP MP & MLA come to blows over placement of names on foundation stone | चपलेनं मारलं; 'शिस्तप्रिय' भाजपाच्या खासदार - आमदारामध्ये 'राडा'

चपलेनं मारलं; 'शिस्तप्रिय' भाजपाच्या खासदार - आमदारामध्ये 'राडा'

Next

संत कबीरनगर - सपा आणि बसपामध्ये झालेल्या आघाडीने उत्तर प्रदेशातभाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येत आहे. संत कबीरनगर मतदारसंघामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि आमदार राकेश सिंह यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या प्रकाराच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून विविध 
ठिकाणी उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. असाच कार्यक्रम संत कबीरनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश सिंह यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.

यावेळी भूमिपूजनाच्या शिलालेखावर आपले नाव नसल्याने खासदार शरद त्रिपाठी संतप्त झाले. त्यावरून त्यांची राकेश सिंह यांच्याशी बाचाबाची झाली. त्यावेळी शरद त्रिपाठी यांनी चप्पल काढून राकेश सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार राकेश सिंह यांनीही त्रिपाठी यांना प्रत्युत्तर देत मारहाण केली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले व दोन्ही नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले. 





या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.  त्यात खासदार शरद त्रिपाठी हे इंजिनिअरशी बोलताना दिसत आहेत. तसेच दोघांचे बोलणे सुरू असताना आमदार राकेश सिंह हे तिथे आल्याचे  दिसत आहे. 

मारहाणीच्या या प्रकारानंतर आमदार राकेश सिंह यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. तसेच राकेश सिंह यांच्या अपमानाचा बदला घेतला जाईल, असे आव्हानही दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून खासदार शरद त्रिपाठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बंद करून ठेवले आहे. तसेच तिथे मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.  



 

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल भाजपाच्या नेतृत्वाने घेतली आहे. तसेच संबंधित खासदार आणि आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश भाजपाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी दिली आहे. 



 

 

Web Title: BJP MP & MLA come to blows over placement of names on foundation stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.