प्रियंका गांधींच्या कपड्यावरुन भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 09:33 AM2019-04-03T09:33:10+5:302019-04-03T09:36:18+5:30

जयकरण गुप्ता यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

bjp leader jayakaran gupta gives disputed statement about priyanka gandhi clothes in meerut | प्रियंका गांधींच्या कपड्यावरुन भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

प्रियंका गांधींच्या कपड्यावरुन भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

Next

मेरठ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच भाजपाचे नेते जयकरण गुप्ता यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या कपड्यावरुन वादग्रस्त विधान केले आहे. जयकरण गुप्ता यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मेरठमध्ये भाजपाच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे नेते जयकरण गुप्ता यांनी काँग्रेसचे नते मोठमोठ्याने म्हणतात, चांगले दिवस आले का? त्यांना चांगले दिवस दिसले नाहीत, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावरही जयकरण गुप्ता यांनी टिप्पणी केली आहे. स्कर्ट परिधान करणारी साडी नेसून मंदिरात माथा टेकवत आहे. गंगाजल नाकारणारेच आता गंगाजल पसंत करत आहेत, असे जयकरण गुप्ता म्हणाले.


  

दरम्यान, प्रियंका गांधी यांची काँग्रेस महासचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपाकडून प्रियंका गांधी यांच्या निवडीवरून तिखट प्रक्रिया व्यक्त केली जात आहे. भाजपाचे नेते हे पातळी सोडून प्रियंका गांधी यांच्यावर टीका करत आहे. 

Web Title: bjp leader jayakaran gupta gives disputed statement about priyanka gandhi clothes in meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.