‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:50 AM2019-05-26T03:50:29+5:302019-05-26T03:52:11+5:30

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे.

bjp demise of Trinamool's Fort | ‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

Next

- समीर परांजपे
लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. मात्र पश्चिम बंगालमधील यशामुळे या पक्षाचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे. या राज्यातील ४२ पैकी १८ लोकसभा जागांवर विजय मिळवून भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसला ४३.२८ टक्के तर भाजपला ४०.२५ टक्के मते मिळाली आहेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या आघाडीने लोकसभेच्या केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
शिवप्रकाश पश्चिम बंगालमध्ये भाजपची संघटना बळकट करत असतानाच राजकीय आघाडी कैलाश विजयवर्गीय यांनी सांभाळली. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची कामगिरी त्यांनी चोखपणे बजावली. माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधून २०१७ साली भाजपत आले ही मोठी घटना होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदार, नेत्यांसह बारा-तेरा जणांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. ममता बॅनर्जी यांचा एककल्ली स्वभाव व कारभार याला बंगालमधील अनेक लोक कंटाळले होते. डावी आघाडी, काँग्रेस मरगळलेले असल्याने त्यांना तृणमूल काँग्रेसविरोधात एक सशक्त पर्याय हवा होता. २८ मार्च ते १ मे या कालावधीत बंगालमध्ये मोदींच्या १० तर शहांच्या ११ सभा पार पडल्या.
कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीमध्ये जो हिंसाचार झाला ती उंटावरील शेवटची काडी ठरली. तृणमूल काँग्रेस व भाजपने एकमेकांवर हिंसाचार घडविल्याचे आरोप केले असले तरी मतदार वस्तुस्थिती जाणून होता. त्याने तृणमूल काँग्रेसला जिव्हारी बसेल असा फटका दिला.
भाजपचे संघटन पश्चिम बंगालमध्ये मजबूत करण्याची कामगिरी त्या पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते शिवप्रकाश यांच्यावर २०१५ साली सोपविण्यात आली.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकेक पाऊल उचलण्यात येत होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत या राज्यामध्ये भाजपच्या मंडलांची संख्या ४१५हून १२८०पर्यंत वाढविण्यात आली.
उत्तर बंग, नवदीप, रार बंग, हुगळी मिदनापूर, कोलकाता अशा पाच विभागांत पक्षवाढीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. या कामात संघाचे स्वयंसेवक अरविंद मेनन, ओडिशाचे भाजप नेते सुरेश पुजारी यांचाही सिंहाचा वाटा होता. पण त्याचा गवगवा करणे भाजपने टाळले.
>विधानसभेतही
कडवे आव्हान
निवडणुकांत मतांच्या टक्केवारीचे प्रमाण पाहिले तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत. भाजपने १२१ विधानसभा मतदारसंघांत मतांची उत्तम बेगमी केली आहे. हे आकडे लक्षात घेता या राज्यात २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसचा भाजप हाच मुख्य प्रतिस्पर्धी असेल हे स्पष्ट होते. ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागांमध्येही भाजप व तृणमूलमध्ये कडवी लढत झाली.
>मै नही मानती
सांप्रदायिकता के रंग मे मुझे नही है विश्वास
सभी धर्मोमे है उग्रता, नम्रता
मै हूं नम्र जागरण की एक सहिष्णू सेविका
उत्थान हुआ जिसका बंगाल मे
विश्वास नही मुझे सामयिक उग्र धर्म बेचने मे
मेरा विश्वास है मानवता धर्म के
आलोक से आलोकित धर्म मे
धर्म बेचना है जिनका ताश
धर्म पहाड पर है पैसोंका वास?
मै रत हूं नीज कर्मोंमे
कर्महीन हो तूम सब!
इसलिए बिकता है उग्रता धर्म?
विश्वास है जिन्हे सहिष्णूता मे
आइए जाग्रत कीजिए
समवेत सभी आइए
जब वसुधैव कुटुंबकम्
तो क्यो है हिसाब-किताब?
उग्रता है जिसकी अभिलाष
ममता बॅनर्जी एक राजकारणी आहेत. तसेच त्या कवयित्री, चित्रकार आणि संगीतज्ञसुद्धा आहेत. निवडणुकांच्या निकालापूर्वी त्यांनी फेसबुकवर स्वत:चा सिंथेसायझर वाजवित असलेला व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘राजनीती’ शीर्षकाची त्यांची एक कविता खूप चर्चेत होती. ‘मै नही मानती’ या त्यांच्या कवितेवर सुमारे ७ हजार लाइक्स मिळाल्या असून १ हजाराहून अधिक ‘नेटिझन्स’नी या कवितेबद्दल ‘रिट्विट’ केले आहे.

Web Title: bjp demise of Trinamool's Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.