भाजपात लोकशाहीच्या पद्धतीनं निर्णय होतात- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 05:54 PM2018-02-18T17:54:58+5:302018-02-18T17:56:44+5:30

भाजपाच्या दिल्ली मुख्यालयाचा पत्ता आता '11 अशोका रोड' ऐवजी '6, दीनदयाल उपाध्याय मार्ग' असा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

BJP decides to form democracy: Narendra Modi | भाजपात लोकशाहीच्या पद्धतीनं निर्णय होतात- नरेंद्र मोदी

भाजपात लोकशाहीच्या पद्धतीनं निर्णय होतात- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली-  भाजपाच्या दिल्ली मुख्यालयाचा पत्ता आता '11 अशोका रोड' ऐवजी '6, दीनदयाल उपाध्याय मार्ग' असा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन केलं आहे. भाजपा हा 100 टक्के लोकशाही पद्धतीनं चालत असलेला पक्ष असल्याचा दावा यावेळी मोदींनी केला. भाजपात निर्णय घेण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंतच्या गोष्टी लोकशाहीच्या माध्यमातूनच होतात. कमी वेळेत इमारतीचं काम पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांनी अमित शाह आणि टीमचं कौतुकही केलंय.

श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाळ उपाध्याय यांनी जे बीज रोवलं होतं, ते आज वटवृक्ष बनून लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करत आहे. हे भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांचं कार्यालय आहे,' असं ते म्हणाले. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांनी उपस्थिती दर्शवली होती. अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं. ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना त्यांची कार्यालयं ल्युटन्स दिल्लीच्या बाहेर स्थलांतरित करायची आहेत.

दीनदयाल उपाध्याय मार्गावर 2 एकराच्या परिसरात भाजपाने हे नवं मुख्यालय उभारलं आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या आहेत. एकाच वेळी 400 वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. या बांधकामात hollow bricks चा वापर करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर विजेसाठी सोलार पॅनलचा वापर करण्यात आलाय. वॉटर हार्वेस्टिंग, बायोटॉयलेट्सचा समावेश करून पर्यावरणाची काळजी घेतल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यालयात एकाचवेळी 600 लोक बसू शकतील, अशा दोन कॉन्फरन्स रूमही आहेत. वायफाय, एलिव्हेटर, टेलिव्हिजन मुलाखतींसाठी स्टुडिओ, डिजिटल लायब्ररी अशा सर्व सोयींनी युक्त असं हे मुख्यालय आहे. त्यामुळे 2019 साठी भाजपची वॉर रुम आता 11, अशोका रोडवरुन 6, दीनदयाल उपाध्याय मार्गावर असणार हे निश्चित झालं आहे.

Web Title: BJP decides to form democracy: Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.