भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 5:51pm

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे.

नवी दिल्ली- भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे. आधी उना, रोहित वेमुला आणि आता भीमा-कोरेगाव ही प्रकरणं याची उदाहरणं असून, यातून जातीयवादी शक्तींना चोख प्रत्युत्तर मिळालं आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारावरून संघ आणि भाजपाला राहुल गांधी यांनी खडे बोल सुनावले आहेत. दलितांनी कायम तळागाळातच राहावं काय ?, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी भाजपाला विचारला आहे.  भीमा-कोरेगावातल्या हिंसाचारात आतापर्यंत एकाला जीव गमवावा लागला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पबल आणि शिकरापूर गावांतील दोन गटांत हा वाद निर्माण झाला आहे. पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरच्या पुणे-अहमदनगर महामार्गावरील पेरणे फाट्याजवळ हा हिंसाचार उफाळून आला आहे.

संबंधित

भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न
PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान
विजयादशमीच्या उत्सवामध्ये रा.स्व.संघाचे शस्त्रपूजन होणारच - प्रमोद बापट
...अन् दान करण्यासाठी काढलेले 500 रुपये राहुल गांधींनी पुन्हा खिशात ठेवले
Rafale Deal Controversy: राफेलची किंमत सांगा, 5 कोटी मिळवा; बिहारमध्ये पोस्टर्स...

राष्ट्रीय कडून आणखी

#MeToo: एम. जे. अकबर यांची खासदारकी धोक्यात 
२० महिला पत्रकार देणार साक्ष
आलोकनाथविरोधात विनता नंदा यांची तक्रार
धक्कादायक....पुण्यात जवानांचा मूकबधीर महिलेवर वर्षभर बलात्कार
शबरीमालाच्या वाटेवरच तणाव, महिलांना दर्शनापासून रोखले

आणखी वाचा