...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 11:20 AM2017-12-07T11:20:32+5:302017-12-07T12:34:36+5:30

ओपिनियन पोलच्या वेगवेगळया अंदाजांमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

As the BJP and Congress fought the battle of Rajkot in Gujarat, | ...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची

...म्हणून गुजरातमधल्या राजकोटची लढाई भाजपा आणि काँग्रेसने केली प्रतिष्ठेची

Next
ठळक मुद्देराजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला असून इथून  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी निवडणूक लढवत आहेत.पेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत.

अहमदाबाद - ओपिनियन पोलच्या वेगवेगळया अंदाजांमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधल्या बातम्यांवरुन गुजरातमध्ये काँग्रेससाठी अनुकूल स्थिती दिसत आहे. पण बहुतांश एक्झिट पोल्सनी गुजरातेत काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई होईल असा अंदाज वर्तवला आहे. 

निवडणूक प्रचाराच्या या रणधुमाळीत सर्वांचे लक्ष लागले आहे ते राजकोट पश्चिममधल्या लढतीकडे. राजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला असून इथून  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरु यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. खरतर इंद्रनील राजगुरु यांचा दुसरा मतदारसंघ होता पण फक्त रुपानी यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी राजकोट पश्चिम मतदारसंघ मागून घेतला. 

पेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत. इंद्रनील राजगुरु पूर्ण तयारीनिशी ठरवून राजकोट पश्चिमच्या मैदानात उतरल्याने इथे अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे   चित्र आहे. कधी नव्हे ती काँग्रेसला इथे अनुकूलस्थिती निर्माण झाली आहे. 

1985 सालापासून एकदाही राजकोट पश्चिममधून भाजपाने पराभव पाहिलेला नाही. राजकोट पश्चिममधून निवडणून आलेल्या उमेदवाराने सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. इंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिमची निवड करण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. वाजूभाई वाला, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ अशी राजकोट पश्चिमची ओळख आहे. वाजूभाई वाला आता कर्नाटकाचे राज्यपाल आहेत, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी 2001 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर या जागेवरुन विजय रुपानी यांना संधी मिळाली. 

त्यावेळी रुपानी 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते. पण आता या मतदारसंघातील परिस्थिती सोपी राहिलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये हिंदुत्व विरुद्ध जीएसटी सामना आहे. त्याचाही फटका रुपानीना बसू शकतो. राजकोट उद्योगाचेही महत्वाचे केंद्र आहे. 80 ते 90 हजार कोटींच्या व्यवसायाची उलाढाल इथे होते. जीएसटीवरुन व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकरी कृषी विम्यावरुनही मतदार असमाधानी आहेत. 

Web Title: As the BJP and Congress fought the battle of Rajkot in Gujarat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.