दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 12:13 PM2017-11-21T12:13:57+5:302017-11-24T17:42:08+5:30

भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे. 

Bichung Bhutiya willing to gove training to Majid Khan | दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी

दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी

Next
ठळक मुद्देफुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आईचा भावूक झालेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजिद खानने दहशतवादाला किक मारुन घर गाठलंटबॉलपटू बायचुंग भुतियाने माजिदला ट्रेनिंग देण्याची तयारी दर्शवली आहेत्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे

श्रीनगर - सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे याचा अनुभव जम्मू काश्मीरमध्ये पहायला मिळाला जेव्हा दहशतवादी संघटनेत सामील झालेला तरुण पुन्हा घरी परतला. आपल्या आईचा भावूक झालेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजिद खानने दहशतवादाला किक मारुन घर गाठलं. या व्हिडीओत त्याची आई आर्त साद घालत माजिदला परत येण्याचं आवाहन करताना दिसत होती. अनेकांचा या घटनेवर विश्वास बसत नसून, हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अनेकजण माजिद खानचं कौतुक असून फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने त्याला ट्रेनिंग देण्याची तयारी दर्शवली आहे. 

भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे. 

'माजिद दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं कळल्यानंतर मला प्रचंड दुख: झालं होतं. फुटबॉलने अनेकांना समाधान दिलं असून त्याला पुन्हा फुलबॉल खेळण्यासाठी प्लॅटफॉर्मची गरज आहे असं मला वाटतं', असं बायचुंग भुतिया बोलला आहेत. मी जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनच्या संपर्कात असून, दिल्लीमधील माझ्या अकॅडमीत प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली आहे असंही त्याने सांगितलं आहे.

माजिद जम्मू काश्मीरमधील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्या या निर्णयामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांना मोठा धक्का बसला होता. माजिद इरशाद एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने थेट फेसबुकच्या माध्यमातूनच हे जाहीर केलं होतं. त्याने फेसबुवर एक फोटोही अपलोड केला होता, ज्यामध्ये त्याच्या हातात एके-47 दिसत होती. 

ट्विटरवर एका वरिष्ठ पोलीस अधिक-याने माजिद इरशाद घरी परतल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, 'माजिद इरशाद घरी परतला आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. त्याच्या आईने केलेल्या प्रार्थनेचं फळ आहे. ज्या तरुणांनी शस्त्र हाती घेतलं आहे, त्यांना आपल्या घरी परत यावं अशी विनंती आहे'. पोलिसांनी सांगितलं आहे की, 'माजिद इरशाद लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तो काही दहशतवाद्यांना ओळखतही होता. तो अनंतनाग डिग्री कॉलेजात कॉमर्सचा विद्यार्थी होता'.

मित्राच्या मृत्यूनंतर माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. माजिद इरशादच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, 'त्याचा जवळचा मित्र यावर निसार ऑगस्ट महिन्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. यानंतर माजिदला एकटेपणा भासू लागला होता. आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारालाही तो गेला होता. त्यानंतर तो पुर्णपणे बदलला'. 

माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि मित्र घरी परत येण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, माजिद इरशाद दहशतवादी संघटनेत सामील झाल्याने कुटुंबियांना मानसिक धक्का बसला होता. त्याच्या आईचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या आर्त साद घालत मुलाला परत येण्याचं आवाहन करताना दिसत होत्या. 

अखेर माजिद इरशादने स्वत:च दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं असल्याने कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Bichung Bhutiya willing to gove training to Majid Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.