जगभ्रमंतीवर निघालेल्या सायकलपटूची चोर समजून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 11:20 AM2018-04-09T11:20:55+5:302018-04-09T11:20:55+5:30

जगभ्रमंतीवर निघालेल्या एका सायकलपटूला रात्रीच्या वेळी वास्तव्यासाठी शेतात तंबू ठोकणे चांगलेच महागात पडले. सायकलीवरून विश्वभ्रमणावर निघालेल्या या सायकलपटूला शेतकऱ्यांनी चोर समजून पडकले आणि त्याला मारहाण केली. 

Beating the cyclist | जगभ्रमंतीवर निघालेल्या सायकलपटूची चोर समजून केली मारहाण

जगभ्रमंतीवर निघालेल्या सायकलपटूची चोर समजून केली मारहाण

Next

हैदराबाद - जगभ्रमंतीवर निघालेल्या एका सायकलपटूला रात्रीच्या वेळी वास्तव्यासाठी शेतात तंबू ठोकणे चांगलेच महागात पडले. सायकलीवरून विश्वभ्रमणावर निघालेल्या या सायकलपटूला शेतकऱ्यांनी चोर समजून पडकले आणि त्याला मारहाण केली. 
त्याचे झाले असे की, जगभ्रमंतीवर निघालेला रशियन सायकलपटू व्ही. ओलेग  तेलंगाणामधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान हवामान खराब असल्याने त्याने राहण्यासाठी एका शेतात तंबू ठोकला. मात्र हा परदेशी पाहुणा चोरी करण्यासाठी आलेला चोर असावा असा गैरसमज तेथील शेतकऱ्याचा झाला. त्या शेतकऱ्याने त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनीही तेथे धाव घेत या रशियन सायकलपटूला मारहाण केली. 
ओलेग हा रशियातील मॉस्को येथील रहिवाशी असून, तो सध्या जगभ्रमंतीवर आहे. यादरम्यान तो निजामाबाद येथून शिर्डीला निघाला होता. वाटेत वास्तव्यासाठी थांबला असताना शेतकऱ्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत ओलेगचा जबडा, डोके आणि खांद्याला दुखापत झाली. ओलेग आणि शेतकरी दोघांनाही एकमेकांची  भाषा कळत नसल्याने गैरजमजातून हा प्रकार घडला. मारहाणीत जखमी झालेल्या ओलेगला आता पुढचे काही दिवस रुग्णालयात राहावे लागणारा आहे.  
 

Web Title: Beating the cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.