सावधान! भारतात दररोज तंबाखूमुळे 2739 लोकांचा होतोय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:06 AM2018-05-31T10:06:02+5:302018-05-31T10:06:02+5:30

तंबाखूपासून लांबच रहावं, असा सल्ला दिला जातो आहे.

Be careful! 2739 deaths due to daily tobacco use in India | सावधान! भारतात दररोज तंबाखूमुळे 2739 लोकांचा होतोय मृत्यू

सावधान! भारतात दररोज तंबाखूमुळे 2739 लोकांचा होतोय मृत्यू

Next

नवी दिल्ली- आज 31 मे रोजी दुनियाभरात तंबाखू निषेध दिवस साजरा केला जातो आहे. तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न करावा व ज्यांना सवय नाही त्यांनी तंबाखूपासून लांबच रहावं, असा सल्ला दिला जातो आहे. तंबाखूमुळे अनेक आजार उद्धभवतात. WHO ने तंबाखू आणि धुम्रपानाच्या इतर उत्तन्नामुळे होणारे आजार व मृत्यूची आकडेवारी लक्षात घेऊन यावर्षीची थीम 'टोबॅको अॅण्ड कार्डियावस्क्युलर डिसीज' म्हणजेच 'तंबाखू आणि ह्रदय रोग' ठेवली आहे. आकडेवाडीनुसार, जगभरात दररोज 70 लाख लोक आणि भारतात दररोज 2739 लोकांचा मृत्यू हा तंबाखू आणि इतर धुम्रपान करणाऱ्या उत्पादनामुळे कर्करोग आणि इतर आजार होऊन होतो. 

तंबाखूमुळे वाढतोय ह्रदय रोगाचा धोका
कॅन्सर सर्जन डॉ. टी.पी साहू यांच्या सांगितलं की, जगभरात कार्डियोवस्क्युलरने होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूमुळे तंबाखूवर बंद गरजेची आहे. तंबाखूमुळे ह्रदयरोगाचा धोका बाढतो. तंबाखूचा धूर हा तितकाच शरीरासाठी हानिकारक आहे. 

तंबाखूच्या सेवनाने ह्रदय विकाराचा अधिक धोका
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबईचे प्रोफेसर डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं की, तंबाखूच्या सेवनाचा शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. शरीराचा कुठलाही भाग तंबाखूच्या परिणामांपासून वाचू शकत नाही. ह्रदय विकाराचा धोका यामुळे अधिक संभवतो. 
 

Web Title: Be careful! 2739 deaths due to daily tobacco use in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.