...तर आता खातेधारकांना व्हॉट्सअॅपवर येणार बँक ट्रान्झॅक्शनचे मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:37 AM2018-06-14T10:37:52+5:302018-06-14T10:37:52+5:30

बँकेच्या व एटीएमच्या प्रत्येक व्यवहारासंबंधीतील मेसेजेस बँक खातेधारकांना पाठवते.

Banks may start to send you banking communications on WhatsApp | ...तर आता खातेधारकांना व्हॉट्सअॅपवर येणार बँक ट्रान्झॅक्शनचे मेसेज

...तर आता खातेधारकांना व्हॉट्सअॅपवर येणार बँक ट्रान्झॅक्शनचे मेसेज

Next

नवी दिल्ली- बँकेतील आपल्या खात्यात पैसे जमा केल्यावर, पैसे काढळ्यावर किंवा इतर कुठल्याही सेवे संदर्भातील माहितीसाठी बँककडून खातेधारकांना मेसेजद्वारे माहिती देण्याची सुविधा आहे. बँकेच्या व एटीएमच्या प्रत्येक व्यवहारासंबंधीतील मेसेजेस बँक खातेधारकांना पाठवते. मेसेजच्या सुविधेनंतर आता बँक व्यवहारांसंदर्भातील माहिती ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर देणार आहे. 

हिंदूस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, देशातील टॉप 5 बँका नव्या सेवेची टेस्टिंग करत आहेत. याअंतर्गत ट्रान्झॅक्शन संबंधित सर्व मेसेज ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठविले जातील. या 5 बँका सर्व व्यवहाराची माहिती खातेधारकांना मेसेजऐवजी व्हॉट्सअॅपवर देणार आहे. यासाठी खातेधारकांना त्यांचा रजिस्टर्ड नंबर बँकेत द्यायचा आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि अॅक्सिक बँक या पाच बँका लवकरच ही सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. 
 

Web Title: Banks may start to send you banking communications on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.