बँकांचा पैसा 15-20 लोकांकडेच, तरुण मात्र बेरोजगार  - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 01:03 PM2018-03-24T13:03:24+5:302018-03-24T13:03:24+5:30

मला वाटतं सरकारने नोटाबंदी करुन मोठी चूक केली असून ती व्हायला नको होती

Banks make money from 15-20 people, but unemployed youth - Rahul Gandhi | बँकांचा पैसा 15-20 लोकांकडेच, तरुण मात्र बेरोजगार  - राहुल गांधी

बँकांचा पैसा 15-20 लोकांकडेच, तरुण मात्र बेरोजगार  - राहुल गांधी

googlenewsNext

म्हैसूर - इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तरीही भारतील तरुण बेरोजगार आहेत. कारण ज्याच्याकडे कौशल्य आहे, आशा तरुणांपर्यंत पैसा जात नाही.  याचे मुख्य कारण म्हणजे देशातील बँकांचा मोठा पैसा 15-20 लोकांकडेच आहे.  त्यामुळे ज्याला गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत पैसे पोहचत नाहीत. परिणामी देशात बेरोजगार वाढत असल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. ते सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. म्हैसूरमधील महारानी आर्ट्स महिला कॉलेजमध्ये ते संबोधित करत होते. 

नोटाबंदी करणे ही सरकारची सर्वात मोठी चूक होती. ती व्हायला नको होती. नोटाबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळं अर्थव्यवस्था आणि आणि रोजगार निर्मितीचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने नोटाबंदी करण्यात आली त्यामुळे मला वैयक्तिक अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळं देशातील रोजगारावर परिणाम झाला आहे. 

पुढे बोलाताना राहुल म्हणाले की, नीरव मोदीने बँकांचे 22 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन देशातून पळ काढला.  जर मी तुम्हाला 22 हजार कोटी रुपये दिले तर तुमच्या सारख्या तरुण महिला अनेक व्यावसायांची निर्मिती करु शकता. मात्र, यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नीरव मोदीसारख्या लोकांना बँकांनी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवल्याने देशातील रोजगार निर्मितीवर विपरीत परिणाम झाला आहे. 
 

Web Title: Banks make money from 15-20 people, but unemployed youth - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.