‘त्या झेंड्यांवर बंदी घालावी’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:24 AM2018-07-17T03:24:13+5:302018-07-17T03:24:52+5:30

चांद-तारा असलेले हिरवे झेंडे हे राष्ट्रद्रोहाचे निदर्शक व इस्लामच्याही विरोधी असल्याने असे झंडे फडकविण्यास देशभर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका शिया वक्फ मंडळाने केली.

 'Ban those flames' | ‘त्या झेंड्यांवर बंदी घालावी’

‘त्या झेंड्यांवर बंदी घालावी’

नवी दिल्ली : चांद-तारा असलेले हिरवे झेंडे हे राष्ट्रद्रोहाचे निदर्शक व इस्लामच्याही विरोधी असल्याने असे झंडे फडकविण्यास देशभर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका शिया वक्फ मंडळाने केली. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यावर केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले.
याचिकेत म्हटले आहे की, असे हिरवे झेंडे मुस्लिम वस्त्यांमध्ये घरांवर आणि धार्मिक स्थळांवर फडकविले जातात. एक तर, असा झेंडा इस्लामविरोधी आहे. दुसरे असे की, हा झेंडा पाकिस्तान मुस्लिम लीगच्या झेंड्याशी मिळताजुळता आहे. असे झेंडे फडकविल्याने हिंदू-मुस्लिमांमध्ये निष्कारण तेढ व तणाव निर्माण होतो.

Web Title:  'Ban those flames'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.