जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी, योगी सरकारचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 09:40 AM2018-12-03T09:40:09+5:302018-12-03T11:32:45+5:30

जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास परवानगी नाकारण्यात आली आहे.

Ban to marriage in January to March, government orders issued | जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी, योगी सरकारचा आदेश जारी

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी, योगी सरकारचा आदेश जारी

Next

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता प्रयागराज येथील लग्नांवरच बंदी घातली आहे. जानेवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी किंवा मार्च 2019 या महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढला असल्यास तो बदलावा लागणार आहे. कारण, या महिन्यात कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

प्रयागराज येथे जानेवारी ते मार्च महिन्यात कुणी लग्नासाठी हॉल बुक केला असेल किंवा इतरही बुकिंग केलं असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रयागराज सोडून इतर शहरात लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सराकारद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या एकदिवस अगोदर आणि एक दिवस नंतर लग्न सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासंबंधीच्या आदेशाची कॉपी हॉटेलमालक आणि लग्न समारंभासाठी हॉल देणाऱ्या मालकांना देण्यात आला आहे. 
दरम्यान, पुढील वर्षी कुंभमेळ्यात पाच पवित्र स्नान होणार आहेत. पहिले स्नान हे मकर संक्रांतीला तर दुसरे पवित्र स्नान पौष पौर्णिमेला होत आहे. त्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात मौनी आमावस्या, वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमेला होणार आहे. तर मार्च महिन्यात महाशिवरात्री एकादशीला पवित्र स्नान होईल. तर 15 डिसेंबर 2018 ते 15 मार्च 2019 या कालावधीत गंगा नदीला स्वच्छ ठेवणे आणि सर्वच चर्म उद्योग बंद ठेवण्याचे आदेशी योगी यांनी दिले आहेत. 
 

Web Title: Ban to marriage in January to March, government orders issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.