प्रिया वॉरियरने भुवई उडवल्याने बेबी डॉल सनी लिओनीचं मार्केट डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:54 AM2018-02-16T10:54:30+5:302018-02-16T10:55:02+5:30

सध्या बेबी डॉल सनी लिओनीला प्रिया वॉरियर टक्कर देत आहे. 

Baby Doll Sunny Leone's Market Down because of Priya Warrior | प्रिया वॉरियरने भुवई उडवल्याने बेबी डॉल सनी लिओनीचं मार्केट डाऊन

प्रिया वॉरियरने भुवई उडवल्याने बेबी डॉल सनी लिओनीचं मार्केट डाऊन

Next

मुंबई - प्रिया प्रकाश वॉरियर हे नाव सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. फक्त एका व्हिडीओमुळे प्रिया प्रकाश वॉरियर घराघरात पोहोचली आहे.  प्रिया प्रकाश वॉरियरचे व्हिडीओतील एक्स्प्रेशन, भुवया उंचावण्याची ती अदा आणि स्माईल सगळ्यावरच तरुणाई फिदा झाली आहे. हा व्हिडीओ वा-याच्या वेगासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अवघ्या काही तासात प्रियाने कधी विचारही केला नसेल इतकी प्रसिद्धी तिला मिळाली. एका रात्रीत प्रिया इंटरनेट सेन्सेशन झाली. पण आता प्रिया वॉरियर फक्त सेन्सेशन राहिली नसून स्पर्धेतही उतरली आहे. सध्या बेबी डॉल सनी लिओनीला प्रिया वॉरियर टक्कर देत आहे. 

गुगल सर्चमध्ये प्रिया वॉरियरने सनी लिओनीला मागे टाकलं आहे. फक्त सनी लिओनीच नाही तर दीपिका पदुकोन, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांनाही प्रिया टक्कर देत आहे. एका रात्रीत सुपरहिट झालेल्या प्रियाबद्दल माहिती मिळवण्यासाठी गुगलवर 'प्रिया प्रकाश' नावाने सर्च केलं जात आहे. गुगल सर्चमध्ये प्रियाने भल्याभल्यांना मागे टाकलं आहे. 

विशेष म्हणजे याआधी इन्स्टाग्रामवर प्रियानं अनेक दिग्गजांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रिया प्रकाश वारियरला एका दिवसात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.  यासहीत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणा-या सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया आता अमेरिकेची मॉडेल काइली जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत पोहोचली आहे.  जेनर आणि ख्रिस्तियानो या दोघांच्याही नावावर केवळ एका दिवसात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्संची संख्या वाढल्याचा रेकॉर्ड आहे. अमेरिकीची मॉडेल काइली जेनरला एक दिवसात 8 लाखांहून अधिक तर ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक दिवसात साडेसहा लाख लोकांनी इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.  

प्रिया प्रकाश स्टारर  'ओरू अडार लव' हा सिनेमा 3 मार्च रोजी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमातील 'मानिका मलयारा पूवी' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच गाण्यातील एक लहान क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

Web Title: Baby Doll Sunny Leone's Market Down because of Priya Warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.