बाबरी मशीद तोडण्यापासून नाही रोखू शकले, मग राम मंदिर बांधण्यापासून कोण रोखेल - योगी आदित्यनाथ

By admin | Published: June 20, 2016 09:34 AM2016-06-20T09:34:19+5:302016-06-20T09:36:21+5:30

अयोध्येत बाबरी मशीद तोडण्यापासून कोणी रोखू शकलं नाही, तर मग बांधण्यापासून कोण रोखू शकेल असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे

Babri could not prevent the mosque from breaking, then who would stop from building Ram temple - Yogi Adityanath | बाबरी मशीद तोडण्यापासून नाही रोखू शकले, मग राम मंदिर बांधण्यापासून कोण रोखेल - योगी आदित्यनाथ

बाबरी मशीद तोडण्यापासून नाही रोखू शकले, मग राम मंदिर बांधण्यापासून कोण रोखेल - योगी आदित्यनाथ

Next
>ऑनलाइन लोकमत - 
लखनऊ, दि. 20 - उत्तर प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतं मिळवण्यासाठी नेत्यांची भाषा बदलू लागल्याचं दिसत आहे. राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत वापरला जाणार नाही असं जरी भाजपा म्हणत असलं तरी भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिरावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'अयोध्येत बाबरी मशीद तोडण्यापासून कोणी रोखू शकलं नाही, तर मग बांधण्यापासून कोण रोखू शकेल', असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. 
 
योगी आदित्यनाथ रविवारी रामकथेवर आधारित कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे भडकाऊ वक्तव्य केलं आहे. 'राम मंदिर बनवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जेव्हा वादग्सस्त बांधकाम तोडण्यापासून कोणी रोखू  शकलं नाही, तर मग मंदिर बनवण्यापासून कोण रोखेल ? 6 डिेसेंबरला कारसेवकांनी बांधकाम तोडल्यानंतर विटेचा एक-एक तुकडा आपल्यासोबत नेला होता. आणि आपल्याला हवा तसा वापरला होता', असं योगी आदित्यनाथ बोलले आहेत.
 
योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची तसंच लोक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथ एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मदर तेरेसा यांच्यावरही टीका करत समाजसेवेच्या नावाखाली धर्मातर करत असल्याचा आरोप केला आहे. 
 

Web Title: Babri could not prevent the mosque from breaking, then who would stop from building Ram temple - Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.