गगनभरारी ! लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:24 AM2018-02-22T10:24:30+5:302018-02-22T10:41:52+5:30

अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे

Avani Chaturvedi creates history by becoming 1st Indian woman fighter pilot to fly solo | गगनभरारी ! लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी

गगनभरारी ! लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 

अवनी चतुर्वेदीचा जन्म 27 ऑक्टोबर 1993 रोजी झाला आहे. तिचे वडिल दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारमध्ये जलसंवर्धन विभागात कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. अवनीचा मोठा भाऊ लष्करात अधिकारी आहे. जगभरात असे निवडक देश आहेत जिथे महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारतात ऑक्टोबर 2015 ला केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. 

महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी 2016 मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात कमिशन केलं होतं. अवनीचं शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यातील एका छोट्या गावात देऊलंद येथे झालं आहे. 2014 मध्ये तिने राजस्थानच्या बनस्थली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर तिने भारतीय हवाई दलाची परिक्षा उत्तीर्ण केली. 

अवनी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील आहे. 25 वर्षीय अवनीने आपलं प्रशिक्षण हैदराबाद एअरफोर्स अकॅडमीतून पूर्ण केलं आहे. एकटीने लढाऊ विमान उडवणं हे तिचं संपुर्ण लढाऊ वैमानिक होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे.  

Web Title: Avani Chaturvedi creates history by becoming 1st Indian woman fighter pilot to fly solo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.