Sabarimala Temple: मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 01:28 AM2018-10-28T01:28:14+5:302018-10-28T01:28:45+5:30

शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही जणांनी शनिवारी सकाळी जोरदार हल्ला केला.

Attack on Swamy's ashram who support women's entry in the temple | Sabarimala Temple: मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला

Sabarimala Temple: मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला

Next

तिरुअनंतपुरम : शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही जणांनी शनिवारी सकाळी जोरदार हल्ला केला. आश्रमात घुसून तिथे तोडफाड करण्यात आली आणि परिसरातील वाहनेही पेटवून देण्यात आली.
तिरुअनंतरपुरमहून ८ कि.मी. अंतरावर संदीपानंद गिरी यांचा आश्रम आहे. त्यांनी महिलांना मंदिरात सरसकट प्रवेश देण्याचे समर्थन केल्यामुळेच आश्रमावर हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोर कोण होते, यांचा शोध आम्ही घेत आहोत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. स्वामी संदीपानंद गिरी हे भगवत गीता स्कूलचे संचालकही आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई, रा.स्व. संघ, मंदिराशी संबंधित राजघराण्यातील काही लोक आणि मंदिरातील पुजारी यांनीच हा हल्ला घडवून आणला, असा आरोप संदीपानंद गिरी यांनी केला आहे. कटू, पण योग्य व खरे बोलणाºयास संपविण्याचा हा कट आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Attack on Swamy's ashram who support women's entry in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.