साध्वी यांचा छळ एटीएसने केलाच नाही, मानवी हक्क आयोगानं केलं स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:20 PM2019-04-20T12:20:00+5:302019-04-20T12:22:13+5:30

साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असताना साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर लावलेले मानसिक छळाचे आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

The ATS did not torture to Sadhvi, the Human Rights Commission clarified | साध्वी यांचा छळ एटीएसने केलाच नाही, मानवी हक्क आयोगानं केलं स्पष्ट 

साध्वी यांचा छळ एटीएसने केलाच नाही, मानवी हक्क आयोगानं केलं स्पष्ट 

googlenewsNext

नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावरुन देशभरात वादंग निर्माण झालेलं आहे. साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असताना साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर लावलेले मानसिक छळाचे आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या सांगण्यावरून तुरुंगामध्ये माझा छळ केला जात होता असा आरोप भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. 

मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह तुरुंगात होत्या. यावेळी तत्कालीन एटीएसप्रमुख असलेले हेमंत करकरे यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी माझ्यावर 9 वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही साध्वी प्रज्ञा सिंह यांचे आरोप अनेकदा फेटाळून लावले होते. साध्वी यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आर.एस खैरे यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्क आयोगाची समिती स्थापन करण्यात आली होती. 2014-15 मध्ये या समितीने केलेल्या चौकशीत साध्वी यांचे आरोप खोटे ठरले. प्रज्ञा सिंह यांनी मानसिक आणि शारीरिक छळाचा जो आरोप लावला होता त्याचे कोणतेही पुरावे आणि साक्ष उपलब्ध होऊ शकले नाहीत असं मानवी हक्क आयोगाने दिलेल्या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले. 


मानवी हक्क आयोगाच्या या समितीत सीआयडी अधिकारी जे. एम कुलकर्णी, दक्षता समितीच्या सदस्या रश्मी जोशी आणि पोलिस दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 2015 साली या समितीने दिलेल्या अहवालात कुठेही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं होतं. या समितीच्या अहवालाच्या चार वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही साध्वी यांचे आरोप फेटाळून लावले होते. 2008 मध्ये दोन रुग्णालयात केलेल्या तपासणीमध्ये साध्वी यांच्या शरिरावर कुठेही जखम का सापडली नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यानंतर साध्वी यांना कोर्टासमोर उपस्थित केले तेव्हाही साध्वी यांनी या प्रश्नावर मौन बाळगलं असल्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.  
 

 

Web Title: The ATS did not torture to Sadhvi, the Human Rights Commission clarified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.