Atal Bihari Vajpayee Speech video- जेव्हा अटलजींनी आपल्या कवितेतून काढली होती पाकिस्तानची पिसं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:09 PM2018-08-16T18:09:31+5:302018-08-16T18:43:12+5:30

Atal Bihari Vajpayee Speech : पाकिस्तानसंदर्भात त्यांनी केलेली कविता विशेष गाजल्यानं आजही लोकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. या कवितेतून त्यांनी पाकिस्तानचाच चेहरा उघडा पाडण्याबरोबरच जगासमोर पाकची पोलखोल केली होती.

Atal Bihari Vajpayee: When Vajpayee slammed Pakistan through his poem | Atal Bihari Vajpayee Speech video- जेव्हा अटलजींनी आपल्या कवितेतून काढली होती पाकिस्तानची पिसं

Atal Bihari Vajpayee Speech video- जेव्हा अटलजींनी आपल्या कवितेतून काढली होती पाकिस्तानची पिसं

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी फक्त चाणाक्ष राजकारणी नव्हते, तर एक भारदस्त कवी होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता फारच अर्थपूर्ण असायच्या. तसेच त्यांनी अनेक विषयांवर कविता केल्या होत्या. पाकिस्तानसंदर्भात त्यांनी केलेली कविता विशेष गाजल्यानं आजही लोकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. या कवितेतून त्यांनी पाकिस्तानचाच चेहरा उघडा पाडण्याबरोबरच जगासमोर पाकची पोलखोल केली होती. अटलबिहारी वाजपेयी यांचं व्यक्तिमत्त्व फारच मनमिळावू होतं. भाजपाचेच काय तर विरोधी पक्षातील नेतेसुद्धा अटलजींचा सन्मान करायचे. आजारपणामुळे भले ते राजकारणापासून दूर गेले असले तरी त्यांच्या कविता आजही अजरामर आहे. पाकिस्तानावर लिहिलेली कविता आजही लोकांच्या ओठांवर रेंगाळत असते. तसेच ती कविता सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाली होती. कवितेतून अटलजींनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानला चुचकारलं होतं, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. अटलबिहारी वाजपेयींनी या कवितेतून पाकिस्तान आणि त्यांना समर्थन देणा-या देशांनाही इशारा दिला होता.

 (Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)

(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)

अटलजींनी पाकिस्तानसंदर्भात केलेली कविता
अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो
अपने पैरों आप कुल्हाड़ी नहीं चलाओ
ओ नादान पड़ोसी अपनी आंखें खोलो....

 

Web Title: Atal Bihari Vajpayee: When Vajpayee slammed Pakistan through his poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.