Atal Bihari Vajpayee : उदारमतवादी चेहरा आता केवळ स्मृतीतच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:18 AM2018-08-17T04:18:16+5:302018-08-17T04:18:30+5:30

केंद्रात वाजपेयी सत्तेवर आहेत, तरीही राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारची काहीच मदत होत नाही, या कारणास्तव राम मंदिर आंदोलनातले समस्त महंत, साधू अन् विहिंपचे नेते सरकारवर संतापले होते.

Atal Bihari Vajpayee: liberal face now only in memory! | Atal Bihari Vajpayee : उदारमतवादी चेहरा आता केवळ स्मृतीतच!

Atal Bihari Vajpayee : उदारमतवादी चेहरा आता केवळ स्मृतीतच!

Next

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीपंतप्रधान असताना २00२ साली ७, रेसकोर्स या त्यांच्या निवासस्थानी घडलेला एक प्रसंग. केंद्रात वाजपेयी सत्तेवर आहेत, तरीही राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारची काहीच मदत होत नाही, या कारणास्तव राम मंदिर आंदोलनातले समस्त महंत, साधू अन् विहिंपचे नेते सरकारवर संतापले होते. विविध आखाड्यांचे महंत व साधू यांचे शिष्टमंडळ एके दिवशी वाजपेयींना भेटायला दिल्लीला आले. हा प्रसंग काही निवडक मराठी पत्रकारांना (केंद्रीय मंत्री प्रमोद महाजनांच्या सौजन्याने) प्रत्यक्ष पाहता आला. महंत व साधूंनी त्रागा व्यक्त करीत यावेळी वाजपेयींचे लक्ष राम मंदिराच्या विषयाकडे वेधले. एक तरुण साधू आक्रस्ताळ्या आवाजात म्हणाला, ‘वाजपेयीजी, हम सबने बचपनसे अखंड भारत का सपना देखा है। सत्ता के शीर्ष स्थानपर आप बैठे है। आप कुछ करते क्यों नही? हम ये उम्मीद अब छोड दे क्या? त्या तरुण साधूकडे पाहत वाजपेयींनी सवयीनुसार एक पॉज घेतला. समस्त साधू महंतांचे चेहरे नीट न्याहाळले. मग एका वाक्यात उत्तर देत म्हणाले, अखंड भारतका सपना देखते हो, जरा शांतीसे सोचो... अगर भूमी आयेगी, तो लोग भी तो आयेंगे, तब क्या करोगे? वाजपेयींचे उत्तर ऐकल्यावर सारे शिष्टमंडळ निरुत्तर झाले.
वन लायनर म्हणजे एका वाक्यात उत्तर देण्यात वाजपेयींचा हातखंडा होता. भारतीय राजकारणात वाजपेयी भाजपचा अस्सल उदारमतवादी चेहरा होते. त्यांचे टीकाकार म्हणायचे की, कायम सौम्य स्मित झळकत असलेला वाजपेयींचा चेहरा हा केवळ मुखवटा आहे; त्यामागे रा.स्व.संघाचा हिंदुत्ववादी चेहरा लपलेला आहे. पण पक्षाच्या व्यासपीठावर वाजपेयी यांनी अडवाणींच्या रथयात्रेविरोधात भूमिका घेतली होती. गुजारात दंगलीबाबतही वाजपेयी म्हणाले होते की, ‘या घटनांबाबत केवळ विरोधकच व्यथित आहेत काय? केंद्र सरकारही तितकेच दु:खी आहे. सर्वांनाच शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे’.

Web Title: Atal Bihari Vajpayee: liberal face now only in memory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.