Atal Bihari Vajpayee : इंदिरा गांधींना दिली होती दुर्गेची उपमा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 05:03 AM2018-08-17T05:03:35+5:302018-08-17T05:03:43+5:30

अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसभेत दुर्गेची उपमा दिली होती. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते.

Atal Bihari Vajpayee: Indira Gandhi had given the metaphor of Durga! | Atal Bihari Vajpayee : इंदिरा गांधींना दिली होती दुर्गेची उपमा !

Atal Bihari Vajpayee : इंदिरा गांधींना दिली होती दुर्गेची उपमा !

googlenewsNext

इंदिरा गांधी यांनी १९७१ युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे हे यश इतके अद्वितीय होते की, अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना लोकभेत ‘दुर्गा’ म्हटले. त्यांचे हे भाषण तेव्हाच्या वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाले होते. वाजपेयी यांच्या या उमदेपणाची देशात सातत्याने चर्चा होत आली आहे. त्याकाळी संसदेतील कामकाजाच्या रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड होऊ शकले नाही. ९० च्या दशकात राजकारणाची दिशा बदलल्यानंतर वाजपेयी यांच्या या वक्तव्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. वाजपेयी खरोखर असे बोलले होते का, याबाबत संभ्रम निर्माण झाला.
जाणकारांच्या मते, वाजपेयी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होत आहे, अशी धारणा भाजपमध्ये निर्माण झाली. भाजप सत्तेच्या जवळ आल्यानंतर वाजपेयी यांचे हे वक्तव्य भाजपला अधिक जाचक वाटू लागले. काँग्रेसमधूनही या वक्तव्याचा लाभ उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे वाजपेयींनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिलीच नव्हती, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली. वाजपेयी यांचे सर्वाधिक निकटचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मेरा देश, मेरा जीवन’ या आपल्या आत्मचरित्रात या वक्तव्याचे खंडन केले आहे. इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा वाजपेयी यांनी नव्हे, तर अन्य एका सदस्याने दिली होती, असे अडवाणी यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाला स्वत: वाजपेयी यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. स्वत: वाजपेयी यांनीही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ‘दुर्गा’ वक्तव्याचा इन्कार केला होता. त्यांनी वाहिनीला सांगितले होते की, १९७१ च्या युद्धातील विजयाबद्दल मी इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती. तथापि, त्यांना दुर्गेची उपमा दिली नव्हती; पण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत मी त्यांना दुर्गा म्हटल्याचे छापून आले! हे कसे घडले मला माहिती नाही!!
वाजपेयी यांचे वक्तव्य खंडन-मंडनात अडकले असले, तरी ते त्यांना कायमचे चिकटले आहे. इंदिरा गांधी यांचा विषय येताच या वक्तव्याची आठवण काढली जाते.
 

Web Title: Atal Bihari Vajpayee: Indira Gandhi had given the metaphor of Durga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.