'ज्योतिषाची भविष्यवाणी आहे की, नरेंद्र मोदी 2019 पर्यंत पंतप्रधान राहणार नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:35 AM2017-11-20T09:35:00+5:302017-11-20T09:36:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्ष आधीच लोकसभा निवडणुका घेतील असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.

'Astrologers predict that Narendra Modi will not be the prime minister till 2019' | 'ज्योतिषाची भविष्यवाणी आहे की, नरेंद्र मोदी 2019 पर्यंत पंतप्रधान राहणार नाहीत'

'ज्योतिषाची भविष्यवाणी आहे की, नरेंद्र मोदी 2019 पर्यंत पंतप्रधान राहणार नाहीत'

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्ष आधीच लोकसभा निवडणुका घेतील असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पक्षाच्या एका बैठकीदरम्यान सांगितलं की, 'मोदी 2019 च्या आधीच 2018 मध्ये लोकसभा निवडणूक घेण्याची शक्यता आहे'. पुढे बोलताना लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं की, 'एका ज्योतिषाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 पर्यंत आपला कार्यकाळ पुर्ण करु शकणार नाही अशी भविष्यवाणी केली आहे. हे सरकार जास्त काळ चालणार नाही कारण ठरलेल्या वेळेआधीच त्यांना निवडणूक लढण्याची तयारी करावी लागणार आहे'. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणूक झाल्यास विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाचा पराभव करतील असा विश्वास व्यक्त केला. 

लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी सरकावर निशाणा साधतना म्हटलं की, आधी लोक वाघाला घाबरायचे, पण आता गाईला घाबरतात. याचं कारण देशातील जिकडे तिकडे पसरलेले गोरक्षक आहेत. 'आधी लोक वाघाला घाबरत होते, आता गाईला घाबरतात. हे मोदी सरकारचं देणं आहे', असा टोला लालूंनी लगावला. 

लालूंनी टीका करताना सांगितलं की, 'नरेंद्र मोदी सरकारकडून 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनं पुर्ण करण्यात न आल्याने लोक नाराज आहेत. मोदी सरकार आपली आश्वासनं पुर्ण करण्यात अयशस्वी ठरलं आहे'. जनता नोटबंदी आणि जीएसटीमुळे त्रस्त आहे असंही लालूप्रसाद यादव बोलले आहेत. आपला मुलगा आणि बिहारचा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या संपर्कात असल्याची माहिती यावेळी लालूंनी दिली आहे. 

दरम्यान भारतातील 73 टक्के लोकांचा नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास असल्याचा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिला आहे. या रिपोर्टमध्ये अशा देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जिथे जनतेचा आपल्या सरकारवर सर्वात जास्त विश्वास आहे. यादीत भारत तिस-या क्रमांकावर आहे. आपल्या सरकावर सर्वात जास्त विश्वास असणा-या देशांमध्ये स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियाचा अनुक्रमे पहिल्या आणि दुस-या क्रमांकावर आहे. तेथील 82-82 टक्के लोकांचा आपल्या सरकारवर विश्वास आहे. 
 

Web Title: 'Astrologers predict that Narendra Modi will not be the prime minister till 2019'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.