नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये आसामने नोंदवली 1.9 कोटी लोकांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 12:55 PM2018-01-01T12:55:04+5:302018-01-01T12:59:04+5:30

एकूण 3.29 कोटी लोकसंख्या असलेल्या आसामने पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा  (एनआरसी) पहिला मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 1.9 कोटी लोकांची नावे समाविष्ट आहेत.

Assam publishes first draft of NRC with 1.9 crore names | नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये आसामने नोंदवली 1.9 कोटी लोकांची नावे

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये आसामने नोंदवली 1.9 कोटी लोकांची नावे

Next
ठळक मुद्देया यादीच्या नोंदणीची प्रक्रीया 2015 च्या मे महिन्यामध्ये सुरु झाली. आसाममधील 68.27 लाख कुटुंबांकडून 6.5 कोटी कागदपत्रे जमा करण्यात आली.

गुवाहाटी- एकूण 3.29 कोटी लोकसंख्या असलेल्या आसामने पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा  (एनआरसी) पहिला मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 1.9 कोटी लोकांची नावे समाविष्ट आहेत. उर्वरित नावांची पडताळणी चालू असल्याचे भारताचे रजिस्ट्रार जनरल शैलेश यांनी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत बोलताना शैलेश म्हणाले, "हा मसुद्याचा पहिला भाग आहे. यामध्ये आतापर्यंत पडताळणी 1.9 कोटी लोकांचा समावेश केला आहे. इतरांची पडताळणी झाल्यावर दुसरा मसुदा तयार होईल." एनआरसीचे राज्य समन्वयक प्रतिक हाजेला म्हणाले, "ज्यांचा पहिल्या यादीत समावेश झालेला नाही त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. नावांची पडताळणी करुन यादी तयार करणं हे अत्यंत किचकट काम आहे. इतरांची कागदपत्रे तपासणे सुरु आहे."

पुढील यादीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम सुरु असल्याचे रजिस्ट्रार जनरल शैलेश यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया 2018मध्येच पूर्ण होईल. या यादीच्या नोंदणीची प्रक्रीया 2015 च्या मे महिन्यामध्ये सुरु झाली. आसाममधील 68.27 लाख कुटुंबांकडून 6.5 कोटी कागदपत्रे जमा करण्यात आली. या यादीबाबत आक्षेपांची नोंदणी करून त्यातील दुरुस्ती अंतिम यादीत समाविष्ट केली जाईल.

ही पहिली यादी आसाममधील एनआरसी सेवा केंद्रांमध्ये सकाळपासून पाहता येईल आणि तसेच ऑनलाइन माहितीही तपासता येईल. त्याचप्रमाणे एसएमएस सेवेचा लाभ घेऊनही नाव तपासता येईल. आसाममध्ये बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात विस्थापित व निर्वासित लोक आले होते. एनआरसीची यादी असणारे आसाम हे एकनेव राज्य असून 1951 साली या राज्याने पहिली यादी प्रसिद्ध केली होती.

Web Title: Assam publishes first draft of NRC with 1.9 crore names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.