काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:12 AM2019-06-20T10:12:43+5:302019-06-20T10:13:45+5:30

राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला. त्यावेळी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गेहलोत यांनी राहुल यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल खुद्द अध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत.

ashok gehlot may be the new congress president may announce soon | काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा

काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाकडून गेहलोत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. परंतु, अद्याप हे स्पष्ट होऊ शकले नाही की, गेहलोत एकटेच काँग्रेस अध्यक्ष होणार की, त्यांच्या साथीला आणखी काही नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष बनविले जाणार. तर गेहलोत यांच्या नावामुळे काँग्रेसचे पुढील अध्यक्षपद गांधी घरण्याकडे नसणार हे देखील स्पष्ट झाले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काँग्रेसकडून लवकरच नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. काँग्रेसने वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले आहे. राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला. त्यावेळी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गेहलोत यांनी राहुल यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल खुद्द अध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत. तसेच अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांच्या नावाचा विचार नसल्याचे राहुल यांनी आधीच स्पष्ट केले होते.

मोदी सरकारकडून कायम काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करण्यात येते. अशा स्थितीत राहुल यांनी गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणाला तरी काँग्रेस अध्यक्ष बनविण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: ashok gehlot may be the new congress president may announce soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.