अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 10:49 PM2018-09-12T22:49:44+5:302018-09-12T22:51:16+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय मल्ल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Arun Jaitley should step down as Finance Minister while this probe is underway, Rahul gandhi tweet | अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले

अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले

Next

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय मल्ल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी भेट घेतली होती, असे मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हटले होते. मल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींना लक्ष्य केले. तसेच विजय मल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे. 

विजय मल्ल्याने आज लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजेरी लावली होती. मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयात हा खटला सुरू आहे. त्यावेळी, मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असे मल्ल्याने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यानंतर, देशभरात खळबळ उडाली. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्र जारी करुन मल्ल्याचा दावा खोडून काढला आहे. तसेच 2014 पासून आजपर्यंत मी मल्ल्याला भेटीसाठी कधीही वेळ दिली नसल्याचे जेटलींनी म्हटले आहे.



 

Web Title: Arun Jaitley should step down as Finance Minister while this probe is underway, Rahul gandhi tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.