राजू नायक - नवी दिल्ली
नौदलाच्या ताब्यातील दाबोळी विमानतळ तसेच गोव्यासह पणजीसारख्या शहरात लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमिनींचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी दिली.
संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर र्पीकर यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून पहिली अधिकृत मुलाखत दिली. ‘कमी बोला, भरपूर काम करा, सुट्टय़ा 
घेऊ नका, मंत्र्यांना सुट्टय़ा नसतात,’ ही पंतप्रधानांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत केलेली सूचना खुद्द मोदीनंतर स्वत: आचरणात आणणारे 
दुसरे कोणी मंत्री असतील तर ते र्पीकरच असतील, याची 
ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली. मंत्रिमंडळाची सोमवारी रात्री साडेआठ वाजता बैठक आटोपून र्पीकर ‘गोवा भवना’त आले. त्यांच्याबरोबर गोव्यातील मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील सचिव पी. कृष्णमूर्ती होते.
र्पीकर सोमवारी रात्री दोन वाजेर्पयत खात्याचे विविध अहवाल वाचत बसले होते. सकाळी सहा वाजता उठून त्यांनी पुन्हा कागदपत्रंचा फडशा पाडला, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले. साडेआठला पुन्हा संरक्षण खात्याच्या बैठकीला रवाना होण्यापूर्वी ‘लोकमत’साठी त्यांनी काही वेळ दिला.
र्पीकर म्हणाले, लष्कराच्या ताब्यातील गोव्यातील जमिनींचा विषय माङया मनात पूर्वीपासून आहे. त्या विषयावर मी यापूर्वी स्पष्ट भूमिका घेतली होती. ‘लष्कर हे जमिनी बळकावणारी मोठी संस्था आहे,’ हे त्यांचे उद्गार त्यावेळी गाजले होते.’ परंतु आता मी संरक्षणमंत्री आहे. त्यामुळे मला मंत्रलयाच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहावे लागेल व त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे, अशी ग्वाही पर्रिकर यांनी यावेळी दिली.
 
च्गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर हे उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. र्पीकर यांचा उमेदवारी अर्ज छाननीवेळी ग्राह्य ठरला, तर इतर अर्ज बाद ठरले. त्यामुळे र्पीकर हे एकटेच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा गुरुवारी होईल.