Army jawan abducted in jammu kashmirs Pulwama | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अपहृत जवानाची हत्या
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अपहृत जवानाची हत्या

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पुलवामामधून दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचं अपहरण केलं आहे. अपहरण करण्यात आलेल्या जवानाचं नाव औरंगजेब असल्याची माहिती मिळाली असून तो पूँछ जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेहसुद्धा सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार लष्कराच्या जवानांना लक्ष्य केलं जात आहे. याशिवाय जवानांची शस्त्रं पळवून नेण्याच्या आणि त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 


दक्षिण काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातून औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं. विशेष म्हणजे औरंगजेब हे सुट्टीसाठी घरी आले होते. या जवानाचा शोध घेण्यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. रमजानच्या महिन्यात काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली आहे. मात्र याच कालावधीत काश्मीरमधील  दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती एका लष्करी अधिकाऱ्यानं दिली.

English summary :
Army personnel kidnapped by militants from Pulwama in Jammu Kashmir The name of the abducted person is Aurangzeb and he is a resident of the pooch district.


Web Title: Army jawan abducted in jammu kashmirs Pulwama
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.