लेह-श्रीनगर केवळ 15 मिनिटांत, आशियातील सर्वात मोठ्या बोगद्याला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 9:45pm

आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा 'झोजी ला' खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली-  आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा 'झोजी ला' खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या बोगद्याला ६,०८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे श्रीनगर व लेह या प्रवासासाठी लागणारा वेळ साडेतीन तासांवरून १५ मिनिटांवर येणार आहे. हा बोगदा १४.२ किमी लांबीचा असून त्याच्यामुळे श्रीनगर, कारगिल, लेह यांच्यातील वाहतूक वर्षभर अखंड राहणार आहे. अन्यथा हिवाळ्यात बर्फवृष्टीनंतर त्यांच्यामधील संपर्क तुटतो. या समस्येवर हा बोगदा उत्तम तोडगा होऊ शकतो. पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या आर्थिक विषयक कॅबिनेट समितीने या बोगद्याच्या कामाला आज हिरवा कंदील दाखवला. यावर बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "हा बोगदा दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा आशियातील सर्वात मोठा बोगदा असेल. त्याच्या निर्मितीसाठी ७ वर्षांचा कालावधी लागेल. अत्यंत खडतर भूपृष्ठ रचना व जेथे पारा शून्याच्या खाली ४५ अंश घसरतो तेथे बांधण्यात येणारा हा बोगदा अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्यच असेल, त्याचे काम यावर्षीच सुरू करण्यात येईल. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि लेह यांच्यामधील प्रवासाचे अंतर १५ मिनिटांवर येईल.'' 'झोजी ला ' समुद्रसपाटीपासून ११,५८७ फूट उंचीवर आहे. तसेच ती श्रीनगर- कारगिल-लेह महामार्गावर असून, बर्फवृष्टी आणि दरड कोसळण्याने हिवाळ्यात येथील वाहतूक खंडित होते.

संबंधित

कोल्हापूर जिल्ह्यात दस्तऐवजांची नोंदणी आता आॅनलाईन ई-म्युटेशनद्वारे
यशवंत पंचायत राजमध्ये भंडारा पंचायत समिती राज्यात प्रथम
दारिद्र्य निर्मूलन दिन विशेष; नागपुरात १२ लाखांवर लोक दारिद्र्यरेषेखाली
मग्रारोहयोच्या कामांवर केवळ ५00 मजूर
पीएमपीला केवळ 10 दिवसांचाच दिलासा

राष्ट्रीय कडून आणखी

अलाहाबादनंतर आता 'या' शहराचं नाव बदलणार
Amritsar Train Accident : रावण साकारणाऱ्या कलाकाराने मृत्यूपूर्वी वाचवले 8 जणांचे प्राण
Police Commemoration Day : 21 ऑक्टोबरला का साजरा होतो पोलीस शहीद दिन?
Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक 
पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

आणखी वाचा