एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:10 PM2018-07-17T15:10:39+5:302018-07-17T15:20:31+5:30

दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये अनिसिया बत्रा या एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या पतीला न्यायालयाने मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

anissia batra death case 14 days judicial custody to mayank singhvi her husband | एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये अनिसिया बत्रा या एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या पतीला न्यायालयाने मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
अनिसिया बत्रा हिचा पती मयांक सिंघवी याला सोमवारी (दि.16) पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यापूर्वी पोलिसांनी मयांक सिंघवी याची जवळपास तासभर चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने मयांक सिंघवी याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 




अनिसियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केल्याने पोलिसांनी कलम ३०४ (ब) अंतर्गत हुंडाबळीचा गुन्हा मयांक सिंघवी विरोधात दाखल केला आहे. तर, मयांक सिंघवी याने छतावरुन उडी मारल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच, मयांक सिंघवी आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप अनिसियाच्या भावाने केला आहे. 
दरम्यान, अनिसिया बत्रा ही लुफ्तहांसा एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत होती. अनिसियाचे वडील सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत.

Web Title: anissia batra death case 14 days judicial custody to mayank singhvi her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.