ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड जोडणी नसेल केली तर 28 फेब्रुवारीपर्यंत करून घ्या अन्यथा तुमचं बॅंक अकाउंट बंद केलं जाण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांचे बॅंक अकाउंट  28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डसह जोडलेले नसतील ते गोठवले जाऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे.  
 
आयकर विभागाच्या निर्देशानंतर सर्व बॅंकांनी आपल्या ग्राहकांना 28 फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. ज्यांच्याकडे पॅनकार्ड नसेल ते बॅंकेत जाऊन 60 नंबरचा फॉर्म भरू शकतात. जनधन खातं आणि झीरो बॅलेन्स अकाउंट असणा-यांसाठी पॅनकार्डची माहिती देणं बंधनकारक नसेल.