आनंद महिंद्रा झाले आजोबा, नेटीझन्सनी केली ही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 2:41pm

एका भावनिक ट्विटमधून त्यांनी ही बातमी सर्वांना दिली.

मुंबई : महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या घरी बऱ्याच वर्षांनी एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. याबाबत त्यांनीच ट्विट करून माहिती दिलीय. त्यांच्या मुलीने एका गोड परीला जन्म दिला आहे. मुलीने दिलेल्या या गोड बातमीमुळे आजोबा फारच खुश दिसताहेत. त्यांनी ही बातमी ट्विट करताच त्यांच्या ग्राहक आणि फॉलोवर्सकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडलाय. तसंच, आता या आनंदात तरी आम्हाला स्कोरपिओ गाडी द्या अशी मागणी नेटीझन्सने केलीय.

भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक म्हणून ओळख असणारे महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आजोबा झाले आहेत. काल-परवापर्यंत आपण केवळ पालक होतो आता आजोबा झालो आहोत आणि या सगळ्या गोष्टी फार चमत्कारीत वाटतात असं त्यांनी ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'शनिवारी माझी आणि माझ्या बायकोची सकाळ नेहमी प्रमाणे झाली, पण रविवारची सकाळ उजाडली तेव्हा आम्ही आजी-आजोबा होतो.' त्यावर अनेक नेटिझन्सने त्याचं अभिनंदन करून त्यांच्या आवडत्या कारची मागणी भेटवस्तूंच्या स्वरुपात केली आहे. आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही पार्टीची अपेक्षा नाही, फक्त तुमच्या प्रसिद्ध गाड्या तुमच्या ग्राहकांना मोफत द्या ए‌वढीच माफक अपेक्षा आहे, अशी गंमतीदार ट्विट करत नेटिझन्सने त्यांचं अभिनंदन केलंय.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अनेक चारचाकी फार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक कारप्रेमीला त्यांच्या गाड्या आपल्याकडे असाव्यात अशी इच्छा असते. म्हणूनच या गोड दिवशी आनंद महिंद्रा यांच्याकडून गाडी भेटवस्तु मिळावी , अशी मागणी नेटकरी करत होते. 

संबंधित

VIDEO- सुरेश रैनाचं मुलीसाठी खास गाणं, 'बिटिया रानी' सोशल मीडियावर व्हायरल
बहिणीशिवाय करमत नव्हतं म्हणून नवऱ्याशीच लावलं लग्न
नवीन वर्षामध्ये व्हॉट्सअॅपने गुपचूप आणलं हे जबरदस्त फिचर
ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या दोन महिन्याच्या बाळाने दिलेल्या स्माईलचं जगाने केलं कौतुक
सांगली :  अंधांना तंत्रज्ञानामुळे मिळतेय नवी दृष्टी, संशोधनाचा फायदा : समाजमाध्यमांच्या कवेत येणार आता अंधही

राष्ट्रीय कडून आणखी

चार वरिष्ठ न्यायमूर्तींशी सरन्यायाधीशांची चर्चा
चीन मुद्यावरून काँग्रेस जाब विचारणार, सीमांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका
पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेश
लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर असा लागेल निकाल, पुन्हा मोदी सरकार की राहुल गांधीचा पलटवार?
मुथरेत दरोडेखोरांच्या चकमकीत निष्पाप मुलाचा मृत्यू, चार पोलीस निलंबित

आणखी वाचा