शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

By admin | Published: October 28, 2014 10:38 AM2014-10-28T10:38:39+5:302014-10-28T12:57:31+5:30

शीखविरोधी हिंसाचारादरम्यान प्रक्षोभक घोषणा दिल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयाने समन्स बजावले आहे.

Amitabh Bachchan summons in Sikh riots | शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

१९८४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी हत्या केल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी बच्चन यांनी 'खून का बदला खून से लेंगे' असे वक्तव्य केले होते.याप्रकरणी शिख फऑर जस्टिसचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंतसिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने बच्चन यांना समन्स बजावले आहे.

 

Web Title: Amitabh Bachchan summons in Sikh riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.