अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 07:37 PM2018-08-13T19:37:35+5:302018-08-13T19:38:23+5:30

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात, या प्रस्तावाला अमित शहा यांनी समर्थन दिले आहे. 

Amit Shah says, 'One nation one election' will save money | अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत... 

अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत... 

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या मुद्दावरुन विधी आयोगाला पत्र लिहिले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात, या विधी आयोगाच्या प्रस्तावाला अमित शहा यांनी समर्थन दिले आहे. 
सध्या देशात कुठे-ना-कुठे तरी निवडणुका होत असतात. या निवडणुकांमुळे फक्त राज्य सरकारच्याच नाही, तर केंद्र सरकारच्या कामकाजावर परिणाम होतो. अनेकदा होणा-या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असतो. याशिवाय, निवडणुकांमुळे प्रशासनावर सुद्धा भार पडतो. त्यामुळे देशातील निवडणुका एकाचवेळी होणे गरजेचे असल्याचे अमित शहा यांनी विधी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी करण्यासाठी विधी आयोगाने ड्राफ्ट तयार केला आहे. यावर चर्चाकरण्यासाठी विधी आयोगाने जुलै महिन्यात राजकीय पक्षांची बैठक बोलविली होती. एनडीएच्या दोन घटक पक्षांसह पाच इतर पक्षांनी या प्रस्तावाला समर्थन दिले होते. मात्र, बाकीच्या 9 पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. 
जेडीयू, अकाली दल, एआयएडीएमके, समाजवादी पार्टी आणि टीआरएस या राजकीय पक्षांनी विधी आयोगाच्या प्रस्तावाला समर्थन दिले होते. तर, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, तेलुगू देशम पार्टी, डीएमके, जेडीएस, एआयएफबी, सीपीएम, एआयजीयूएफ, गोवा फॉरवर्ड पार्टी या पक्षांनी विरोध दर्शविला होता. तसेच, काँग्रसने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.  



 



 

Web Title: Amit Shah says, 'One nation one election' will save money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.