राज्यपालांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गृहमंत्रालयातर्फे चौकशी; महिला कर्मचा-यांनी केल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:54 AM2018-02-27T00:54:58+5:302018-02-27T00:54:58+5:30

दक्षिणेकडील एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आले असून, त्यांच्याविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार राजभवनात काम करणा-या महिला कर्मचा-यांनीच केली आहे.

The allegations of sexual harassment on governors, inquiries by the Home Ministry; Complaints made by women employees | राज्यपालांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गृहमंत्रालयातर्फे चौकशी; महिला कर्मचा-यांनी केल्या तक्रारी

राज्यपालांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गृहमंत्रालयातर्फे चौकशी; महिला कर्मचा-यांनी केल्या तक्रारी

googlenewsNext

नवी दिल्ली : दक्षिणेकडील एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आले असून, त्यांच्याविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार राजभवनात काम करणा-या महिला कर्मचा-यांनीच केली आहे.
या राज्यपालांच व संबंधित राज्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. राजभवनात काम करणा-या महिला कर्मचा-यांना त्यांनी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप आहे. गृहमंत्रालयाने या प्रकरणाची अतिशय गंभीरपणे दखल घेतली आहे, तसेच तपास यंत्रणांना आरोपांच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही समजते. चौकशी अहवालात आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास, राज्यपाल महोदयांना राजीनामा देण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मेघालयचे राज्यपाल षण्मुखनाथन यांच्याविरोधातही अशीच तक्रार करण्यात आली होती. षण्मुखनाथन यांनी राजभवन म्हणजे लेडिज क्लब बनवल्याचा आरोप त्या वेळी झाला होता. त्या वेळी राजभवनातील १00 हून अधिक कर्मचाºयांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे तक्रार केली होती. षण्मुखनाथन यांनी राजभवनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचा आरोप करताना, तिथे राज्यपालांच्या परवानगीने मुली येत असतात आणि काही तर त्यांच्या बेडरूममध्ये जातात, असा गंभीर आरोप झाला होता.
एन. डी. तिवारीही होते अडकले-
२७ जानेवारी २0१७ रोजी षण्मुखनाथन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. नारायण दत्त तिवारी आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना, त्यांच्यावरही सेक्स स्कँडलचे आरोप झाले होते. त्यांचे स्टिंग आॅपरेशनही करण्यात आले होते. त्यानंतर, आरोग्याचे कारण पुढे करीत नारायण दत्त तिवारी यांनीही राज्यपालपदाचा डिसेंबर २00९ मध्ये राजीनामा दिला होता.

Web Title: The allegations of sexual harassment on governors, inquiries by the Home Ministry; Complaints made by women employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.