'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 05:01 PM2019-07-22T17:01:05+5:302019-07-22T17:04:55+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचं विधान

All Madrassas In Uttarakhand To Hoist indian flags On This Independence Day | 'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'

'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'

Next

देहरादून: येत्या स्वातंत्र्यदिनी देशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे. १५ ऑगस्टला सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् म्हटलं जाईल, असंही कुमार यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाला देण्यात आल्याचं कुमार म्हणाले. 'मदरशांमधील विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती दिली जाईल,' असंदेखील त्यांनी सांगितलं. इंद्रेश कुमार राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे मार्गदर्शकदेखील आहेत. 

उत्तराखंडमध्ये ७०० हून अधिक मदरसे आहेत. यातील ३०० हून अधिक मदरशांची नोंद राज्य सरकारकडे आहे. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावण्याबद्दल एक अधिकृत सूचना राज्यातील सर्व मदरशांना पाठवण्यात येईल, अशी माहिती उत्तराखंड मदरसा बोर्डचे संचालक बिलाल रहमान यांनी दिली. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व समजावं, त्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती मिळावी, हे आमचे प्रमुख उद्देश असल्याचंही ते पुढे म्हणाले. 

उत्तराखंडमधील सर्व मदरशांमध्ये १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिन आणि मदरसे यांच्याबद्दल इंद्रेश कुमार यांनी केलेल्या विधानावर कानपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या मौलाना मुफ्ती हानिफ बरकती बरेलवी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. आम्ही दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आम्हाला देशभक्ती दाखवून देण्यासाठी कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही, असं मत बरेलवींनी व्यक्त केलं. 
 

Web Title: All Madrassas In Uttarakhand To Hoist indian flags On This Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.