साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 03:04 PM2019-01-21T15:04:12+5:302019-01-21T15:06:05+5:30

राज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली आहे.

Akhilesh Yadav attack on yogi government's pension scheme |  साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला

 साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला

Next
ठळक मुद्देराज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राम आणि सीतेला पेन्शन द्यावी तसेच त्यातून पैसे वाचलेच तर रावणालाही पेन्शन द्यावीभाजपाच्या महिला आमदारांनी ज्या भाषेचा वापर केला तशी भाषा कुणीही कुणासाठी वापरत नाही

लखनौ - राज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली आहे. योगी सरकारने साधू-संतांना पेन्शन द्यावी. आम्ही सरकारमध्ये असताना रामलीलेमध्ये काम करणाऱ्या राम आणि सीतेच्या पात्रांनी पेन्शन देण्याची योजना सुरू केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राम आणि सीतेला पेन्शन द्यावी तसेच त्यातून पैसे वाचलेच तर रावणालाही पेन्शन द्यावी, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे. 

योगी सरकारवर टीका करताना अखिलेश यादव म्हणाले,''साधू-संतांना दरमहा कमीत कमी 20 हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच यश भारती आणि समाजवादी पेन्शनसुद्धा सुरू झाली पाहिजे. रामायण पाठ आणि रामलीलावाल्यांनांही पेन्शन द्या.''  स्वप्ने पाहणारे आणि संघर्ष करणारे नवतरुण नवभारत निर्माण करण्याचे काम करतात. समाजवादी पार्टी अशाच गुणवान तरुणांची संघटना आहे, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.  

यावेळी मायावतींविरोधात भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या वक्तव्याचाही अखिलेश यादव यांनी निषेध केला. ''भाजपाच्या महिला आमदारांनी ज्या भाषेचा वापर केला तशी भाषा कुणीही कुणासाठी वापरत नाही. भाजपावाले हताशेमधून अशी भाषा वापरत आहेत. आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी त्यांची भाषा अजूनच घसरत जाईल. तसेच केवळ स्थानिक नेत्यांचीच नव्हे तर भाजपाचे मोठे नेतेही अशाच भाषेचा प्रयोग करतात, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.   

Web Title: Akhilesh Yadav attack on yogi government's pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.