नवी दिल्ली - पोलंडमधील भारतीय राजदूत आणि अनुभवी राजनाईक अजय बिसारीया यांची पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री उशीरा याबाबत घोषणा केली. अजय बिसारीया हे 1987 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते आता गौतम बंबावले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबावले यांची चीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. अजय बिसारीया लवकरच कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा आहे असं मंत्रालयाने एका अधिकृत विधानामध्ये म्हटलं.  
कोण आहेत अजय बिसारीया -
अजय बिसारिया 1988-91 मध्ये मॉस्को दूतावासमध्ये तैनात होते. त्यांनी 1999-2004 दरम्यान पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून देखील काम केलं आहे. जानेवारी, 2015 पासून ते पोलंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.   


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.