दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राजधानी दिल्ली, हायअलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 07:26 AM2018-06-02T07:26:22+5:302018-06-02T07:26:22+5:30

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानकं, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती मिळते आहे.

airports railway stations and malls on target of terrorists | दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राजधानी दिल्ली, हायअलर्ट जारी

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राजधानी दिल्ली, हायअलर्ट जारी

Next

नवी दिल्ली- दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानकं, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती मिळते आहे. यामुळे दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणा आयबीने ही माहिती जारी केली आहे. दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतात दिल्ली एअरपोर्टसह इतर गर्दीच्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नवभारत टाइम्सला पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टसारखे दिवस नसूनही अशा प्रकारे माहिती मिळणं धक्कादायक आहे. त्यामुळे अलर्टला गंभीरपणे घेतलं जात आहे. अलर्ट मिळाल्यापासून दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी तपास वाढविण्यात आला आहे. विशेष करून दिल्ली एअरपोर्टवर विमान हायजॅकची शक्यता आणि रेल्वे स्टेशनवर गोळीबाराची शक्यता लक्षात घेता प्रत्येक गाडीची तपासणी केली जातीये. दरम्यान, अलर्टमध्ये कुठल्याही दहशतवादी संघटनेचं नाम लिहिण्यात आलेलं नाही. पण यामागे लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मदचा हात असण्याची शक्यता आहे. दिल्लीत दहशतवादी घुसल्याची माहिती नसली तर काही दिवसांपासून काही दहशतवादी संघटना दिल्लीमध्ये मोठं काम करण्याच्या विचारात असल्याचं समजतं आहे. 

बुधवारी दिल्लीचे पोलीस अधिकारी अमूल्य पटनायक यांनी दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी व उपाययोजनांसाठी सर्व पोलिसांची बैठक घेतली. 
 

Web Title: airports railway stations and malls on target of terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.